मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री शरद पवार आज जुन्नर-आंबेगाव दौऱ्यावर गेले होते. रविवारी पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शरद पवारांनी मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “माझ्याकडे कृषी खातं असताना शेतकऱ्यांच्या पीकाला योग्य भाव देत होतो, मात्र सध्या लक्ष दिलं जात नाही.”
शरद पवारांची मोदी सरकारवर टीका
- तोडणीचा खर्चही निघत नसून शेतकरी पीक फेकून देत आहेत.
- कांद्याचा खर्चही निघत नसून अन्य गोष्टींनाही किंमत मिळत नाही.
- माझ्याकडे १० वर्षीय केंद्रीय कृषी खातं होतं. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देणं त्यावेळी मी कटाक्षाने पाळलं.
- यामुळे शेतकरी या देशाची भूक भागवतोच, मात्र संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवण्याची कामगिरी करु शकतो.
- शेतकऱ्यांनी हे करुन दाखवलं आहे.
- सध्या दुर्दैवाने केंद्र सरकारमध्ये यासंदर्भात गरज आहे तितकं लक्ष दिलं जात नाही.
- त्यामुळे शेतमालाच्या किंमती घसरताना दिसत आहे.
सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव महादेव तथा दादासाहेब काळे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळाव्यानिमित्त शरद पवार आले होते. यावेळी बोलताना शरद पवारांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्षाचा मुद्दा मांडला.