Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तरप्रदेश-पंजाबच्या निवडणुकांमध्ये फटक्याच्या भीतीने शेतकरी कायदे मागे! – शरद पवार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sharad Pawar Good Mood 19-11-21

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला मारला आहे.  उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये फटका बसणार असल्याचं लक्षात आल्यामुळे हे कायदे मागे घेण्यात आले. उशिरा का होईना मोदी सरकारला शहाणपण आलं आहे, असे शरद पवार म्हणाले.

 

शरद पवारांचे वर्मावर बोट!

  • मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतले हे योग्यच झालं.
  • कोणतीही चर्चा न करता केंद्र सरकारने हे कायदे आणले.
  • त्यामुळे या कायद्याला शेतकऱ्यांकडून विरोध झाला.
  • देशाच्या इतिहासात एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी देशाच्या राजधानीच्या सीमेवर बसले.
  • थंडी, ऊन, वारा, पावसाचा विचार न करता शेतकरी संघर्ष करत आहेत.
  • शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढायला हवा होता. पण सरकारने तसे केलं नाही.
  • त्यामुळे संघर्ष झाला.
  • उत्तर प्रदेशचा काही भाग राजस्थान, पंजाब हरयाणातील शेतकरी या आंदोलनात होते. आता पंजाब, उत्तर प्रदेशात निवडणुका होणार आहेत.
  • निवडणूक प्रचारासाठी गावात गेल्यावर शेतकरी जाब विचारतील हे लक्षात आल्यावर केंद्र सरकारने कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला.
  • उशीरा का होईना शहाणपण आलं.
  • एक वर्ष संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, असं पवार म्हणाले.

 

चर्चा न करताच तीन कायदे थेट संसदेत आणले!

  • कृषी क्षेत्रात काही बाबतीत बदल करावा लागेल असं वाटल्याने आम्ही त्यावर विचार सुरू केला होता.
  • गुंतवणुकीत बदल करावा, शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ मिळावी याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू होता.
  • मी दहा वर्ष कृषी मंत्री होतो. मी अनेकांशी या मुद्द्यावर चर्चा केली.
  • कायद्यात दुरुस्ती करावी की आणखी काय करावं याची चर्चा झाली.
  • कृषी कायदा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने किंवा मंत्रिमंडळाने घ्यावा या मताचा मी नव्हतो. कारण हा विषय राज्याचा आहे.
  • राज्य सरकार मंत्री, विद्यापीठं आणि शेतीशी संबंधित लोकांना सोबत घेऊन निर्णय घ्यावा असं माझे मत होते.
  • मी राज्यांचे कृषी, पणन आणि सहकार खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर सरकार बदललं. त्यांनी तीन कायदे थेट संसदेत आणले.
  • नव्या सरकारने या कायद्यावर चर्चाही केली नाही.
  • शेतकरी, राज्य सरकार, शेतकरी संघटना आणि खासदारांसोबत मोदी सरकारने चर्चा केली नाही.
  • ही प्रक्रिया पार पडली नाही. दोन-तीन तासात कायदे मंजूर केले.

Tags: farm lawsfarmerssharad pawarकृषी कायदेशरद पवारशेतकरी
Previous Post

बळीराजाच्या रेट्यापुढे केंद्रातील अहंकारी, हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारला झुकावे लागले!: नाना पटोले

Next Post

राज्यात ९०६ नवे रुग्ण, ९१८ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात ९०६ नवे रुग्ण, ९१८ रुग्ण बरे होऊन घरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!