मुक्तपीठ टीम
मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं हे देवेंद्र फडणवीसांचं विधान चांगलचं गाजलं आहे. अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोला लगावला आहे. पाच वर्ष सत्तेत असल्याचं स्मरण राहणं हे कधीही चांगलं. वेदना किती खोल आहे हे यातून दिसतं, असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे.
सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसत
- आज मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना पवार यांनी फडणवीसांना चांगलाच टोला लगावला आहे.
- पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे.
- मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही.
- ही आमची कमतरता आहे हे मी कबूल करतो, सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं.
- सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो.
मावळमध्ये जे झालं त्याला सत्ताधारी जबाबदार नव्हते
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काही भाष्य केलं. मावळमध्ये काय घडलं हे त्यांनी सांगितलं हे बरं झालं.
- त्यावेळी कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. मावळमध्ये जे झालं.
शेतकरी मृत्यूमुखी पडले. - त्याला राजकीय पक्षाचे सत्ताधारी जबाबदार नव्हते.
नेतेही जबाबदार नव्हते. - तो आरोप पोलिसांवर होता.
- कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने हे प्रकर घडलं.
- फडणवीसांनी मावळ आणि लखीमपूरची तुलना केली.
- मावळच्या शेतकऱ्यांचा नाराजी सत्ताधाऱ्यांवर होती.
- पण नंतर यात सत्ताधाऱ्यांचा संबंध नसल्याचं मावळच्या लोकांच्या लक्षात आलं.
- तर परिस्थिती हाताबाहेर जावी म्हणून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रोत्साहित केलं.
- त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली, असं मावळच्या लोकांना आज वाटतंय.
मावळची वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली आहे. - त्याच मावळमध्ये भडकवण्याचं काम कोणी केलं हे मावळच्या जनतेच्या लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके ९० हजार मतांच्या फरकाने विजयी झाले.
- मावळमध्ये संताप असता तर एवढ्या वर्षांनी राष्ट्रवादीची जागा आली नसती.
- माजी मुख्यमंत्र्यांनी मावळचं उदाहरण काढलं हे बरं झालं.
- त्यांनी मावळची मानसिकता जाणून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल.