Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता शरद पवार इन्स्पायर फेलोशिप! अर्ज प्रक्रिया सुरु…समजून घ्या, कशी असणार निवड प्रक्रिया?

यशवंतराव प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी केली कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपची घोषणा

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं
0
Sharad Pawar Inspire Fellowship

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवारांचा १२ डिसेंबर रोजी येणारा वाढदिवस यावर्षापासून अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषी आणि साहित्य क्षेत्रात काहीतरी नवे करु इच्छिणाऱ्या होतकरु तरुण तरुणींना तर शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या सहाय्याने काम करणाऱ्या शिक्षकांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप दिल्या जाणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी फेलोशिपची घोषणा केली.

 

शरद पवार इन्स्पायर फेलोशिपची घोषणा करण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, की “आदरणीय पवार साहेब गेली साठ वर्षांहून अधिक काळ देशातील सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय देशाच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारे ठरले आहेत. शेती क्षेत्रासाठी त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा आजही जनतेला फायदा होत आहे. याशिवाय औद्योगिक विकास, सामाजिक न्याय युवक कल्याण शिक्षण आणि महिलांचे सक्षमीकरण इ. इ. अशा विविध क्षेत्रामध्ये पवार साहेबांनी केलेले कार्य क्रांतिकारी असून पुढील अनेक पिढ्यासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.”

 

आदरणीय पवार साहेबांच्या प्रदिर्घ अशा कारकिर्दीत देशाच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारे अनेक निर्णय झाले. अनेक नव्या उपक्रमांना चालना मिळाली. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई 'शरद पवार इनस्पायर फेलोशीप'ची घोषणा करीत आहे. pic.twitter.com/bQF5FkY6M9

— Supriya Sule (@supriya_sule) October 8, 2021

 

“पवार साहेबांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांनी घालून दिलेला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सुत्राचा वसा कायम ठेवला. पवार साहेबांच्या नावाने फेलोशिप जाहिर करताना आनंद होत असून याचा विकासाची जाण असणाऱ्या आणि समाजासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याची धमक असणाऱ्या तरुण-तरुणीना नक्कीच फायदा होईल,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

त्या पुढे म्हणाल्या की, “यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन अॅग्रीकल्चर’, ‘शरदचंद्र पवार इन्स्पायर लिटररी फेलोशिप (शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती) आणि शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन या तीन फेलोशिप दिल्या जाणार आहेत. यापैकी शेती आणि साहित्य क्षेत्रातील फेलोशिपचा कार्यक्रम दि. ८ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार असून निवडलेल्या फेलोची घोषणा दि. १ डिसेंबर रोजी करण्यात येईल. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवशी निवडलेल्या फेलोंना ती फेलोशिप सन्मानपूर्वक प्रदान केली जाणार आहे..

 

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप निवडीची प्रक्रिया कशी असणार?

शेती

  • शेती क्षेत्रासाठी फेलोशिपसाठी महाराष्ट्रातील जिज्ञासू, विषयातील रुची आणि परिणामकारक नेतृत्त्वगुण या निकषावर या तरुण-तरुणीची तज्ज्ञांच्या कमिटीद्वारे निवड करण्यात येईल. यासाठी राज्यभरातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • त्यातून शॉर्टलिस्ट केलेल्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. त्यानंतर तज्ज्ञांची कमिटी त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील ८० जणांची फेलोशिपसाठी निवड केली जाणार आहे.
  • या फेलोंना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करुन देण्यात येणार असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ व अभ्यासक त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

 

साहित्य

  • साहित्य क्षेत्रातील नव्या प्रवाहांमध्ये दमदार लेखन करणाऱ्या प्रयोगशील लेखक लेखिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे.
  • यासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून शॉर्टलिस्ट झालेल्या तरुण-तरुणींच्या मुलाखती घेऊन त्यातून दहा जणांना ही फेलोशिप जाहिर करण्यात येणार आहे.
  • या फेलोना साहित्य निर्मितीसाठी नामवंत साहित्यिक मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय त्यांना पुस्तक प्रकाशनासाठी मदत देखील करण्यात येणार आहे.

 

शिक्षण

  • शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन एज्युकेशन चा कार्यक्रम डिसेंबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्रातील काहीतरी नवे करू इच्छिणाऱ्या प्रयोगशील तरुणाईसाठी ही एक संधी आहे.
  • MKCL फौंडेशन, बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांचे फेलोशिप उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे.
  • शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन एज्युकेशन’चे मुख्य समन्वयक विवेक सावंत असतील

 

फेलोशिपची २०२१-२२ ची रूपरेषा खालीलप्रमाणे

  • अर्ज मागविण्याची तारीख :८ ऑक्टोबर २०२१
  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२१
  • अर्जांची छाननी करण्याची तारीख १६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर
  • निवडीची घोषणा १ डिसेंबर २०२१
  • फेलोशिपची सुरुवात १२ डिसेंबर २०२१ पासून

अर्ज www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

 

याप्रसंगी फेलोशिपच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमत टकले, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री बी. के. अग्रवाल, शरद पवार इनस्पायर लिटररी फेलोशिप’चे मुख्य समन्वयक प्रा. नितीन रिंढे, आदी उपस्थित होते. त्याचबरोबर शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन अॅग्रिकल्चरचे मुख्य समन्वयक डॉ निलेश नलावडे हे झूमद्वारे उपस्थित होते.

 


Tags: sharad pawarsharad pawar inspire fellowshipsupriya suleyashwantrao chavan pratishthanयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानशरद पवारशरद पवार इन्स्पायर फेलोशिपसुप्रिया सुळे
Previous Post

विदर्भातील कृषी निर्यात वाढीसाठी कृषीमाल गुणात्मक उत्पादन, प्रक्रिया, विपणन आवश्यक!

Next Post

राज्यात २,४८६ नवे रुग्ण, २,४४६ रुग्ण बरे! पुन्हा चार जिल्ह्यांमध्येच राज्याचे निम्म्यापेक्षा जास्त नवे रुग्ण!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात २,४८६ नवे रुग्ण, २,४४६ रुग्ण बरे! पुन्हा चार जिल्ह्यांमध्येच राज्याचे निम्म्यापेक्षा जास्त नवे रुग्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!