Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“बहुमताच्या बळावर कृषि कायदे मंजूर केले, तरी ते मागे घ्यावे लागणारच!”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी केंद्र सरकारला ठणकावले

January 27, 2021
in घडलं-बिघडलं
0
Sharad Pawar Azad Maidan -1

मुक्तपीठ टीम

“देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीच्या सीमेवर थंडी, वाऱ्याची पर्वा न करता केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेले ६० दिवस आंदोलन करत आहेत. परंतु देशाच्या पंतप्रधानांनी या शेतकऱ्यांची साधी चौकशी तरी केली का?” असा सवाल करत केंद्र सरकाला शेतकऱ्यांची कणव नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत केला. तसेच भाजप सरकारने बहुमताच्या बळावर कायदे मंजूर केले असेल. त्यांची अंमलबजावणी केली असली तरी लोकांचा असंतोष पाहून त्यांना ते मागे घ्यावे लागतीलच, असेही पवार यांनी ठणकावले.

 

Sharad Pawar Azad Maidan -2

“केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात राज्यातल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. परंतु राज्यपाल गोव्याला गेले. त्यांना कंगणाला भेटण्यासाठी वेळ आहे पण शेतकऱ्यांना भेटायला मात्र वेळ नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल मिळेल असे वाटलं नव्हतं. मात्र महाराष्ट्राला असा राज्यपात मिळाला, असा खोचक टोलाही शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते.

 

“मुंबई महत्वाची आहे. ऐतिहासिक वारसा आहे. या मुंबईत सुरु झालेल्या आंदोलनामुळे राज्यसत्ता नेहमीच उलथून टाकण्यात आली आहे. स्वातंत्र्यपूर्व क१९४२ साली चलेजाव चळवळीची हाक देण्यात आली आणि ब्रिटिशांना भारत सोडून जावे लागले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी १९५७-५८ साली आंदोलन सुरु झाले. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. आता केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात राज्याच्या काना कोपऱ्यातील सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरतो तेव्हा सरकारला लोकांचे म्हणणे मान्यच करावे लागते,” असे बजावत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना इशारा दिला.

 

Sharad Pawar Azad Maidan -3

“देशाच्या पंतप्रधानांना पंजाबमधल्या शेतकऱ्यांची चौकशी केली का ? पंजाबमधील शेतकरी हा पाकिस्तान, खलिस्तानचा आहे का ? असा सवाल करत शरद पवार यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांनाच परकीय नागरीक ठरवित असल्याचा आरोप केला. हा कायदा मंजूर करण्याआधी केंद्राने किमान चर्चा करायला हवी होती.

कृषि कायद्यांचा प्रवास – काय, कसं चुकलं?

आमचं म्हणणं या कायद्याच्या अनुषंगाने एवढचं आहे की, २००३ मध्ये कृषि कायद्याची चर्चा सुरु झाली. संसदेत हा विषय झाला. त्यानंतर देशातील सर्व राज्यांच्या कृषिमंत्र्याची बैठक बोलावून चर्चा केली. ती चर्चा संपली नाही. तरीही या कायद्याच्या निर्मिती आणि अंमलबजावणीसाठी भाजपा सरकारने पुढाकार घेतला. संसदेत त्यांनी एकाच दिवशी तिन्ही कायदे आणले. एकाच दिवसात तिन्ही कायदे आणून बहुमताच्या जोरावर मंजूर केले. त्यावेळी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि इतर नेत्यांनी या कायद्यावर चर्चा व्हावी अशी मागणी केली. मात्र त्यांनी व्यवस्थित चर्चा केली नाही.”

“कायद्याची सखोल चर्चा करण्यासाठी स्वतंत्र सिलेक्ट कमिटी असते. या कमिटीकडे हा कायदा पाठवा अशी विनंती आम्ही केली. सिलेक्ट कमिटीत सगळ्या पक्षाचे लोक असतात. त्यात चर्चा होऊन एकमताने निष्कर्ष काढले जातात. शेती कायद्यासाठी हा मार्ग होता. पण केंद्र सरकारने चर्चा न करता, कमिटी स्थापन न करता आम्ही मांडलेला कायदा जशाच्या तसा आणावा असा आग्रह धरला. हा घटनेचा व संसदेचा अपमान होता.  संसदेत जरी बहुमताच्या जोरावर तुम्ही कायदा पास केलात तरी त्या विरोधात सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरल्यानंतर तो तुम्हाला मागे घ्यावा लागणार, असा इशाराही त्यांनी दिला.

 

राज्यपालांचा खुलासा – गोव्यात विधानसभेच्या अधिवेशनासाठी!

डाव्या संघटनांच्या नेतृत्वाखाली कामगार – शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्यपालांना अभिनेत्री कंगणाला भेटायला वेळ आहे. मात्र शेतकऱ्यांना भेटण्यास वेळ नसल्याचा टोला लगाविल्यानंतर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याबाबत तात्काळ खुलासा करत आपण गोवा विधानसभेच्या पहिल्या सत्राला संबोधित करण्यास जाणार असल्याची माहिती यापूर्वीच मोर्चेकऱ्यांना दिल्याचे एका प्रसिध्दी पत्रकान्वये स्पष्ट केले.


Tags: Farmer protestncp president sharad pawarsharad pawarमुंबई शेतकरी मोर्चाराष्ट्रवादी पक्ष अध्यक्ष शरद पवारशरद पवारशेतकरी मोर्चा
Previous Post

प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच शक्तिशाली ‘राफेल’ची झलक

Next Post

पद्म पुरस्कार जाहीर, अनाथांची माय सिंधुताई सपकाळांना पद्मश्री!

Next Post
Sindhutai Sapkal

पद्म पुरस्कार जाहीर, अनाथांची माय सिंधुताई सपकाळांना पद्मश्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!