Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शरद पवारांनी उघड केली आयटीची नवी मोडस ऑपरेंडी, आता नेत्यांच्या जवळची माणसं लक्ष्य!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sharad pawar

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आयकर विभागाच्या कारवाईवरून जोरदार हल्ला चढवला. आयकर विभागाने पवार कुटुंबीयांवर टाकलेल्या धाडीवरून टोला लगावला आहे. पाहुण्यांनी यावं पाहुणचार घ्यावा पण अजीर्ण होईल इतका पाहुणचार होऊ नये अशा शब्दात पवारांनी आयकर विभागाला सुनावले आहे. त्याचवेळी त्यांनी आयटीची नवी मोडस ऑपरेंडी उघड केली. ते म्हणाले, आता नेत्यांच्या जवळची माणसं लक्ष्य केली जात आहेत, असं दिसतं.

अजीर्ण होईल इतका पाहुणाचार असू नये

  • पाहुणे हा शब्द वापरला हे चांगलं केलं.
  • हा शब्द मी कॉईन केला होता.
  • मी बोलेल पण त्यांची चौकशी झाल्यावर बोलेल. वस्तुस्थिती सांगेल.
  • ती चौकशी सुरू आहे. केंद्रातील काही अधिकाऱ्यांकडून काही माहिती घेतली.
  • पाहुणे येतात.
  • अनेक ठिकाणी येतात.
  • एक दिवस असतात, दोन दिवस असतात, तीन दिवस असतात,
  • आजचा सहावा दिवस आहे.
  • पाहुणचार घ्यावा, पण अजीर्ण होईल इतका पाहुणाचार असू नये.
  • आज सहाव्या दिवशीही दोन तीन ठिकाणी पाहुणे
  • माझ्या घरातील मुलींची त्यांनी आठवण केली. या तिन्ही मुलींचा कारखाना नाही.
  • एक पब्लिकेशनमध्ये आहे. एक डॉक्टर आहे. तिसरी गृहिणी आहे.
  • त्यांचा या सर्वांशी संबंध नाही. ठिक आहे तिकडे गेले चौकशी केली.
  • एक दीड दिवसात चौकशी केली. त्यांनाही जायची घाई होती.
  • पण त्यांनाही सारखे फोन येत होते. थांबा म्हणून सांगितलं जात होतं. अजून घर सोडू नका.
  • आमच्या मुलींनी विचारलं, दोन दिवस झाले… तीन दिवस झाले… तुमच्या घरचे वाट पाहत असतील.
  • त्यांनी सांगितलं आम्हाला जायचंय, पण आम्हाला सूचना आहेत की आम्ही सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही.
  • त्यामुळे पाच दिवस झाल्यावर काहीजणांनी घर सोडले.
  • आज सहाव्या दिवशीही दोन तीन ठिकाणी पाहुणे आहेत.

 

सत्तेचा गैरवापर!

• सत्तेचा गैरवापर पाहिला त्याचं वास्तव चित्रं समोर आलं
• आतापर्यंत अशा एजन्सीनी अनेक ठिकाण चौकशी केल्या.
• पण त्या सहा दिवस केल्या हे कधी ऐकलं नाही.
• कदाचित काही नवीन धोरणं स्वीकारली असतील तर त्याबाबत तक्रार करण्याची आज ही वेळ नाही.
• योग्यवेळी त्याचा विचार करू.
• सहा दिवस मिडल क्लास फॅमिलीमध्ये पाहुणे राहिले.
• आपली घरे छोटी असतात.
• दोन बेडरूम किंवा तीन बेडरूमचा हॉल असतो.
• कोल्हापुरात जास्त लोकं नव्हते.
• नवरा-बायको राहतात तिथे १८ लोकं गेली.
• घरात बसायला, बाकीची साधनं वापरायला जागा… यावर भाष्य करण्याची गरज नाही.
• असं कधी पाहिलं नव्हतं, असं घडलं नव्हतं.
• असो सत्तेचा गैरवापर पाहिला त्याचं वास्तव चित्रं समोर आलं.

 

जवळच्या लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न!

• केंद्र सरकारने राज्यातील तीन पक्षांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे.
• केंद्रातील भाजपने महाराष्ट्रातील सरकार दोन वर्षे अस्थिर करण्याचा प्रयत्न केला.
• सरकारला लक्ष्य करत असताना त्यातील जे मुख्य घटक आहेत, त्याला थेट लक्ष करण्यापेक्षा त्या घटकांच्या जवळच्या लोकांवर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केल्याचे धोरण त्यांनी आखलेले दिसत असल्याचे पवार म्हणाले.
• माझ्या असे वाचनात आले की, अशोक चव्हाण यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला झाला होता, मात्र अशोक चव्हाण यांच्यावर हल्ला झालेला नव्हता.
• अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने थेट न जाता त्यांच्या जवळच्या लोकांना लक्ष्य केले आहे.
• मंत्री सुभाष देसाई यांच्या चिरंजीवांच्या जवळच्या लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.


Tags: sharad pawarअजित पवार
Previous Post

सोमय्यांच्या घोषित हल्ल्याआधीच पवारांचा प्रतिहल्ला! तरीही सोमय्यांकडून नवा आरोप आणि अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी!!

Next Post

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कोणते निर्णय?

Next Post
cabinet meeting

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कोणते निर्णय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!