मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आयकर विभागाच्या कारवाईवरून जोरदार हल्ला चढवला. आयकर विभागाने पवार कुटुंबीयांवर टाकलेल्या धाडीवरून टोला लगावला आहे. पाहुण्यांनी यावं पाहुणचार घ्यावा पण अजीर्ण होईल इतका पाहुणचार होऊ नये अशा शब्दात पवारांनी आयकर विभागाला सुनावले आहे. त्याचवेळी त्यांनी आयटीची नवी मोडस ऑपरेंडी उघड केली. ते म्हणाले, आता नेत्यांच्या जवळची माणसं लक्ष्य केली जात आहेत, असं दिसतं.
अजीर्ण होईल इतका पाहुणाचार असू नये
- पाहुणे हा शब्द वापरला हे चांगलं केलं.
- हा शब्द मी कॉईन केला होता.
- मी बोलेल पण त्यांची चौकशी झाल्यावर बोलेल. वस्तुस्थिती सांगेल.
- ती चौकशी सुरू आहे. केंद्रातील काही अधिकाऱ्यांकडून काही माहिती घेतली.
- पाहुणे येतात.
- अनेक ठिकाणी येतात.
- एक दिवस असतात, दोन दिवस असतात, तीन दिवस असतात,
- आजचा सहावा दिवस आहे.
- पाहुणचार घ्यावा, पण अजीर्ण होईल इतका पाहुणाचार असू नये.
- आज सहाव्या दिवशीही दोन तीन ठिकाणी पाहुणे
- माझ्या घरातील मुलींची त्यांनी आठवण केली. या तिन्ही मुलींचा कारखाना नाही.
- एक पब्लिकेशनमध्ये आहे. एक डॉक्टर आहे. तिसरी गृहिणी आहे.
- त्यांचा या सर्वांशी संबंध नाही. ठिक आहे तिकडे गेले चौकशी केली.
- एक दीड दिवसात चौकशी केली. त्यांनाही जायची घाई होती.
- पण त्यांनाही सारखे फोन येत होते. थांबा म्हणून सांगितलं जात होतं. अजून घर सोडू नका.
- आमच्या मुलींनी विचारलं, दोन दिवस झाले… तीन दिवस झाले… तुमच्या घरचे वाट पाहत असतील.
- त्यांनी सांगितलं आम्हाला जायचंय, पण आम्हाला सूचना आहेत की आम्ही सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही.
- त्यामुळे पाच दिवस झाल्यावर काहीजणांनी घर सोडले.
- आज सहाव्या दिवशीही दोन तीन ठिकाणी पाहुणे आहेत.
सत्तेचा गैरवापर!
• सत्तेचा गैरवापर पाहिला त्याचं वास्तव चित्रं समोर आलं
• आतापर्यंत अशा एजन्सीनी अनेक ठिकाण चौकशी केल्या.
• पण त्या सहा दिवस केल्या हे कधी ऐकलं नाही.
• कदाचित काही नवीन धोरणं स्वीकारली असतील तर त्याबाबत तक्रार करण्याची आज ही वेळ नाही.
• योग्यवेळी त्याचा विचार करू.
• सहा दिवस मिडल क्लास फॅमिलीमध्ये पाहुणे राहिले.
• आपली घरे छोटी असतात.
• दोन बेडरूम किंवा तीन बेडरूमचा हॉल असतो.
• कोल्हापुरात जास्त लोकं नव्हते.
• नवरा-बायको राहतात तिथे १८ लोकं गेली.
• घरात बसायला, बाकीची साधनं वापरायला जागा… यावर भाष्य करण्याची गरज नाही.
• असं कधी पाहिलं नव्हतं, असं घडलं नव्हतं.
• असो सत्तेचा गैरवापर पाहिला त्याचं वास्तव चित्रं समोर आलं.
जवळच्या लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न!
• केंद्र सरकारने राज्यातील तीन पक्षांना लक्ष्य केल्याचे दिसत आहे.
• केंद्रातील भाजपने महाराष्ट्रातील सरकार दोन वर्षे अस्थिर करण्याचा प्रयत्न केला.
• सरकारला लक्ष्य करत असताना त्यातील जे मुख्य घटक आहेत, त्याला थेट लक्ष करण्यापेक्षा त्या घटकांच्या जवळच्या लोकांवर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केल्याचे धोरण त्यांनी आखलेले दिसत असल्याचे पवार म्हणाले.
• माझ्या असे वाचनात आले की, अशोक चव्हाण यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला झाला होता, मात्र अशोक चव्हाण यांच्यावर हल्ला झालेला नव्हता.
• अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने थेट न जाता त्यांच्या जवळच्या लोकांना लक्ष्य केले आहे.
• मंत्री सुभाष देसाई यांच्या चिरंजीवांच्या जवळच्या लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.