Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शरद पवार आक्रमक! ‘ईडी’ लावली तर जनतेनं भाजपाला ‘येडी’ ठरवलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sharad pawar

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लखीमपूर शेतकरी हत्याकांड प्रकरणी त्यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली. तसेच आयकर धाडीबद्दल बोलतानाही त्यांच्याविरुद्ध ईडी लावली तर जनतेने भाजपालाच येडी ठरवलं, असा टोलाही मारला.

 

शरद पवारांनी अनेक मुद्द्यावर यावेळी भाष्य केले. “तुमच्या हाती कशासाठी सत्ता दिली याचं विस्मरणच भाजपाला झालेलं आहे, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. तसेच मनपा निवडणुकीत भाजपा सोडून इतर पक्षांनी एकजूट झाले पाहिजे, तिथे राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान झाला पाहिजे, अन्यथा स्वतंत्र लढूया, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

भाजपाच्या हाती सत्ता कशासाठी दिली यांचं विस्मरण!

  • लखीमपूर खेरीमध्ये शेतकरी रस्त्यावर आले.
  • आमच्या प्रश्नांकडे भाजपाचं सरकार दुर्लक्ष करतं याबद्दलची नापसंती व्यक्त करण्यासाठी ते आले.
  • तिथे शेतकरी आल्यानंतर भाजपाचे नेते रस्त्याने जात असताना त्या शेतकऱ्यांच्या अंगावर त्यांनी गाड्या घातल्या.
    ८ लोक मृत्यूमुखी पडले.
  • सर्वोच्च न्यायालयाने नोटीस काढून जे लोक मृत्यूमुखी पडले त्या सगळ्यांची माहिती मागवली आहे.
  • तुमच्या हातात सत्ता लोकांनी दिली ती लोकांचं भलं करण्यासाठी दिली आहे याचं विस्मरण भाजपा सरकारला झालं आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांची हत्या करण्याचं पाप केलं.
  • याचा संताप पूर्ण देशात आहे.

 

महागाईमुळे जनता जेरीस

  • महागाईमुळे जनता जेरीस आली आहे.
  • नेहरुंनी विकासाचा पाया रचला मात्र आताचं सरकार काय करतंय?
  • दीडशे वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या देशात विकास नव्हता.
  • नेहरुंनी पाया रचला.
  • आज केंद्र सरकार काय करतंय?
  • या सरकारला रेल्वेची जागा विकून खासगीकरण करण्यात रस आहे.
  • या देशात सुई तयार होत नव्हती, आता इथे रेल्वे तयार होतात.
  • मात्र त्याची विक्री आणि खासगीकरणाचा घाट आहे.

 

ईडीची नोटीस पाठवणाऱ्या भाजपाला महाराष्ट्रानं येडी ठरवलं

  • अजित पवारांकडे सरकारी पाहुणे (आयकर छापा) आले होते.
  • पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते.
  • निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणाच्यासंबंधित मला ईडीची नोटीस पाठवली.
  • ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली.
  • ईडीची नोटीस पाठवणाऱ्या भाजपाला महाराष्ट्रानं येडी ठरवलं
  • सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत.
  • जनता यांना धडा शिकवेल.

Tags: BJPDeputy Chief Minister Ajit PawarfarmersNCPncp president sharad pawarsolapurभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसलखीमपूर शेतकरी हत्याकांडशरद पवारसोलापूर
Previous Post

स्कूल बससाठी सरकारने ठरवलेली एसओपी पाळली जातेय का?

Next Post

कोरोना योद्धे विशेष गृहनिर्माण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Next Post
CIDCO

कोरोना योद्धे विशेष गृहनिर्माण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!