मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लखीमपूर शेतकरी हत्याकांड प्रकरणी त्यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली. तसेच आयकर धाडीबद्दल बोलतानाही त्यांच्याविरुद्ध ईडी लावली तर जनतेने भाजपालाच येडी ठरवलं, असा टोलाही मारला.
शरद पवारांनी अनेक मुद्द्यावर यावेळी भाष्य केले. “तुमच्या हाती कशासाठी सत्ता दिली याचं विस्मरणच भाजपाला झालेलं आहे, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. तसेच मनपा निवडणुकीत भाजपा सोडून इतर पक्षांनी एकजूट झाले पाहिजे, तिथे राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान झाला पाहिजे, अन्यथा स्वतंत्र लढूया, असे आवाहन त्यांनी केले आहे.
भाजपाच्या हाती सत्ता कशासाठी दिली यांचं विस्मरण!
- लखीमपूर खेरीमध्ये शेतकरी रस्त्यावर आले.
- आमच्या प्रश्नांकडे भाजपाचं सरकार दुर्लक्ष करतं याबद्दलची नापसंती व्यक्त करण्यासाठी ते आले.
- तिथे शेतकरी आल्यानंतर भाजपाचे नेते रस्त्याने जात असताना त्या शेतकऱ्यांच्या अंगावर त्यांनी गाड्या घातल्या.
८ लोक मृत्यूमुखी पडले. - सर्वोच्च न्यायालयाने नोटीस काढून जे लोक मृत्यूमुखी पडले त्या सगळ्यांची माहिती मागवली आहे.
- तुमच्या हातात सत्ता लोकांनी दिली ती लोकांचं भलं करण्यासाठी दिली आहे याचं विस्मरण भाजपा सरकारला झालं आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांची हत्या करण्याचं पाप केलं.
- याचा संताप पूर्ण देशात आहे.
महागाईमुळे जनता जेरीस
- महागाईमुळे जनता जेरीस आली आहे.
- नेहरुंनी विकासाचा पाया रचला मात्र आताचं सरकार काय करतंय?
- दीडशे वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या देशात विकास नव्हता.
- नेहरुंनी पाया रचला.
- आज केंद्र सरकार काय करतंय?
- या सरकारला रेल्वेची जागा विकून खासगीकरण करण्यात रस आहे.
- या देशात सुई तयार होत नव्हती, आता इथे रेल्वे तयार होतात.
- मात्र त्याची विक्री आणि खासगीकरणाचा घाट आहे.
ईडीची नोटीस पाठवणाऱ्या भाजपाला महाराष्ट्रानं येडी ठरवलं
- अजित पवारांकडे सरकारी पाहुणे (आयकर छापा) आले होते.
- पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते.
- निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणाच्यासंबंधित मला ईडीची नोटीस पाठवली.
- ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली.
- ईडीची नोटीस पाठवणाऱ्या भाजपाला महाराष्ट्रानं येडी ठरवलं
- सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत.
- जनता यांना धडा शिकवेल.