Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शरद पवारांकडून अदानींचं कौतुक, “देशातील पायाभूत सुविधांच्या विकासात मोठं योगदान!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gautam Adani And Sharad pawar

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांचे कौतुक केले आहे. गौतम अदानी यांनी शून्यापासून सुरुवात केली परंतु आता देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या (जिटो) जागतिक परिषदेत शरद पवार बोलत होते. ते म्हणाले की, एकेकाळी श्रीमंतांच्या यादीत बिर्ला आणि टाटा यांचा समावेश होता. आता आठवडाभरापासून मी एका जैन व्यक्तीबद्दल वाचत आहे जो देशातील सर्वात श्रीमंत माणूस बनला आहे आणि ते म्हणजे गौतम अदानी.

पुढे ते म्हणाले की, ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी शून्यातून सुरुवात केली. आता विमानात कुठेही जा आणि तुम्हाला अदानीचं विमानतळ वापरावं लागेल. जवळपास ७० टक्के विमानतळ अदानी यांच्या मालकीचे आहेत.

त्याचवेळी, पायाभूत सुविधा हा विकासाचा आधार असल्याचे शरद पवार म्हणाले आणि या क्षेत्रात अदानीचेही मोठे अस्तित्व आहे. हे योगदान केवळ अदानी समूहासाठी नाही तर देशासाठी आहे, असे पवार म्हणाले. देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या लोकांना आपण विसरू शकत नाही.

अदानी यांची एकूण संपत्ती १२३ अब्ज डॉलर

  • गौतम अदानी जगभरातील अब्जाधीशांमध्ये आता पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
  • फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, अदानी १२३ अब्ज डॉलर्स संपत्तीसह पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत.
  • आता अदानी जगातील सर्वात श्रीमंत एलॉन मस्क, अॅमेझॉनचे जेफ बेझोस, बर्नार्ड अर्नॉल्ट आणि बिल गेट्स यांच्या पुढे आहे.
  • गौतम अदानी मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सपेक्षा फक्त ७ अब्ज डॉलर्स मागे आहेत.

Tags: gautam adanisharad pawarगौतम अदानीशरद पवार
Previous Post

वैतरणा नदी पात्रातील लाकडी फळीवरचा जीवघेणा प्रवास थांबला, आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने लोखंडी पूल!

Next Post

सर्वोच्च न्यायालयात दोन नवे न्यायाधीश, न्या. पारदीवाला २०२७नंतर सरन्यायाधीश!

Next Post
Supreme court

सर्वोच्च न्यायालयात दोन नवे न्यायाधीश, न्या. पारदीवाला २०२७नंतर सरन्यायाधीश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!