मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांचे कौतुक केले आहे. गौतम अदानी यांनी शून्यापासून सुरुवात केली परंतु आता देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या (जिटो) जागतिक परिषदेत शरद पवार बोलत होते. ते म्हणाले की, एकेकाळी श्रीमंतांच्या यादीत बिर्ला आणि टाटा यांचा समावेश होता. आता आठवडाभरापासून मी एका जैन व्यक्तीबद्दल वाचत आहे जो देशातील सर्वात श्रीमंत माणूस बनला आहे आणि ते म्हणजे गौतम अदानी.
पुढे ते म्हणाले की, ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी शून्यातून सुरुवात केली. आता विमानात कुठेही जा आणि तुम्हाला अदानीचं विमानतळ वापरावं लागेल. जवळपास ७० टक्के विमानतळ अदानी यांच्या मालकीचे आहेत.
त्याचवेळी, पायाभूत सुविधा हा विकासाचा आधार असल्याचे शरद पवार म्हणाले आणि या क्षेत्रात अदानीचेही मोठे अस्तित्व आहे. हे योगदान केवळ अदानी समूहासाठी नाही तर देशासाठी आहे, असे पवार म्हणाले. देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या लोकांना आपण विसरू शकत नाही.
अदानी यांची एकूण संपत्ती १२३ अब्ज डॉलर
- गौतम अदानी जगभरातील अब्जाधीशांमध्ये आता पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
- फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, अदानी १२३ अब्ज डॉलर्स संपत्तीसह पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत.
- आता अदानी जगातील सर्वात श्रीमंत एलॉन मस्क, अॅमेझॉनचे जेफ बेझोस, बर्नार्ड अर्नॉल्ट आणि बिल गेट्स यांच्या पुढे आहे.
- गौतम अदानी मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सपेक्षा फक्त ७ अब्ज डॉलर्स मागे आहेत.