Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटी संपावर लवकरच तोडगा निघणार? शरद पवारांशी चर्चेनंतर अनिल परब मध्यम मार्गावर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sharadPawar

मुक्तपीठ टीम

एसटीचं राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीवरून गेल्या पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाबाबत सोमवारी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात साडेचार तासाची चर्चा झाली. या चर्चेत एसटी कर्मचारी आणि त्यांचे प्रश्न, त्यांच्या वेतनवाढीचा विषय, इतर राज्यांमध्ये कसं ट्रान्सपोर्ट चालतं त्यांचे पगार काय आहेत? या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

 

काय म्हणाले अनिल परब?

  • या बैठकीत काहीही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आलीय. स्वतः अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
  • मुंबईमध्ये वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली.
  • मागील काही दिवस एसटी संप सुरु आहे, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे, ग्रामीण भागातील लोकांचे हाल होत आहेत.
  • आज मला शरद पवार यांनी बोलावलं होतं.
  • अधिकारी आणि आमच्याकडून परिस्थिती समजून घेतली.
  • यातून काय मार्ग निघू शकतो, संप कसा मिटू शकतो त्याबाबत प्रयत्न करण्याबाबत, एसटीची आर्थिक परिस्थिती, एसटी रुळावर कशी येईल, संपकऱ्यांच्या मागण्या याबाबत सविस्तर चर्चा झाली.
  • शरद पवार यांना सर्व माहिती दिली.
  • याबाबतीत वेगवेगळे पर्याय कसे काढता येतील, मार्ग काढून कामगार आणि जनतेचं समाधान करता येईल याबाबतही चर्चा झाली.

 

सरकारकडून समितीसमोर काय भूमिका मांडावी याबाबतही चर्चा

  • विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाच्या समिती समोर आहे.
  • सरकारने या समितीसमोर काय भूमिका मांडावी याबाबतही चर्चा झाली.
  • विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, त्याबाबतचा अहवाल येणार आहे, तो अहवाल आम्ही स्वीकारु.
  • हा अहवाल हायकोर्टाच्या समितीच्या माध्यमातूनच येईल.
  • पण त्यासमोर आपण काय बाजू मांडायची याबाबत आज सविस्तर चर्चा पवारांसोबत झाली.

मध्यम मार्ग काढायला हवा

  • पगारवाढ किंवा खासगीकरण असा विशेष मुद्दा काही चर्चचा विषय नाही, काही चर्चा सार्वजनिक करण्यासारख्या नाहीत, ठाम भूमिका कोणीही घेऊन चालणार नाही, दोन्ही बाजूचे समाधान कसं होईल असा मध्यम मार्ग काढायला हवा आणि तशी चर्चा या बैठकीत झाली.
  • हा संप लवकरात लवकर संपावा, यात कर्मचारी आणि प्रवासी दोघांचंही नुकसान होत आहे असेही अनिल परब यांनी म्हटले.

Tags: Anil Parabsharad pawarST Strikeअनिल परबएसटी संपशरद पवार
Previous Post

“मराठा समाजाची माफी मागा, पुन्हा आरक्षण मिळवून द्या”

Next Post

राज्यात ६५६ नवे रुग्ण, ७६८ रुग्ण बरे होऊन घरी! सोमवारी मुंबई, पुणे दोनशेखाली!

Next Post
MCR maharashtra corona report 22-11-21

राज्यात ६५६ नवे रुग्ण, ७६८ रुग्ण बरे होऊन घरी! सोमवारी मुंबई, पुणे दोनशेखाली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!