Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकार गेलं, संकटं आली! पवारांमागे आयटी, राऊतांमागे ईडी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay Raut And Sharad pawar

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर गरुवारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागली. राज्यात ठाकरे सरकार जाताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत. शरद पवार यांना जुन्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत आयकर खात्याने नोटीस पाठवली आहे. तर संजय राऊत आज ईडी चौकशीला सामोरे जाणार आहेत, त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

शरद पवार यांनाही आयकर खात्याने नोटीस पाठवली आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश भरत तपासे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये बदल झाल्यानंतर लगेचच आयकर विभाग शरद पवार यांना २००४, २००९, २०१४ आणि २०२० च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांसाठी नोटीस देतो. हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काही?, असे ते म्हणाले.

शरद पवारांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक!

  • एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
  • त्यात ते म्हणाले होते की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले जाईल, अशी अपेक्षा नव्हती.
  • पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले
  • एकनाथ शिंदे यांच्या नवीन जबाबदारीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
  • एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांना गुवाहाटीत नेण्याची ताकद त्यांनी दाखवली.
  • त्यांनी लोकांना शिवसेना सोडण्याची प्रेरणा दिली.
  • मला माहित नाही की हे आधी घडले की नाही, परंतु तयारीशिवाय हे होऊ शकत नाही.

संजय राऊत ईडी चौकशीला हजर!

  • ईडीने संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले आहे.
  • यापूर्वी एप्रिल महिन्यात ईडीने पत्राचाळ प्रकरणातच संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबाग येथील मालमत्ता जप्त केल्या होत्या.
  • यामध्ये संजय राऊत यांच्या मुंबईतील राहत्या घराचाही समावेश होता.
  • गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
  • ईडीने दुसऱ्यांदा नोटीस दिल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत आज दुपारी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत.
  • त्यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे.
  • मी आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो. तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये असे आवाहन करतो, असे ते म्हणाले.

Tags: EDITsharad pawarshivsena sanjay rautआयटीईडीशरद पवारसंजय राऊत
Previous Post

राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

सत्तेवर येताच फडणवीसांचा आरे जंगलातच मेट्रो कार शेडचा निर्णय! समजून घ्या पूर्ण प्रकरण…

Next Post
devendra Fadnavis decides to set up metro car shed in Aarey forest

सत्तेवर येताच फडणवीसांचा आरे जंगलातच मेट्रो कार शेडचा निर्णय! समजून घ्या पूर्ण प्रकरण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!