Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भात उत्पादनात वाढ घडवणारी सह्याद्रीची वीरांगणा

September 6, 2026
in प्रेरणा
0
shantabai dhonde (1)

मुक्तपीठ टीम

सह्याद्रीच्या कुशीत दूर डोंगर माथ्यावर वसलेल्या आंबेवंगण या आदिवासी दुर्गम गावात वास्तव्यास असलेल्या शांताबाई खंडू धांडे या आदिवासी महिलेने तंत्रज्ञानाची कास धरत आपल्या पारंपरिक शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवा आहे. त्यांनी भातासारख्या पारंपरिक पिकाच्या उत्पादनात दुपटीने वाढ घडवून आणली आहे.

आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे भात हे मुख्य पीक असल्याने आदिवासी बांधवांचे जीवन चरितार्थाचे मुख्य पीक मानले जाते. पूर्वी पारंपरिक पध्दतीने भात पिकाची लागवड केली जायची त्यात मोठ्या प्रमाणावर बियाणे, मजूर, आणि रासायनिक खते व औषधखतांचा मोठा वापर केला जात होता. त्यामुळे भात शेती खूप खर्चिक आणि उत्पन्नाच्या बाबतीत तोट्याची होत चालली होती. या पद्धतीने एकरी सरासरी फक्त १० ते १२ क्विंटल उत्पन्न मिळत असे. या परिस्थितीत उत्पादन घटत होते आणि जमीनीही रासायनिक खतांच्या अती वापरणे खराब होत असल्याच लक्षात आल्या. नंतर अशिक्षित अशा शांताबाई धांडेंनी पुढे येत उत्पादन कस वाढेल याची माहीती घेण्यास सुरवात केली.

shantabai dhonde (3)

बायफ या आंतरराषट्रीय दर्जा प्राप्त संस्थेबरोबर कार्य सुरू करून त्यांच्या तज्ञांकडून भात लागवडीच्या विविध पद्धतींचा अभ्यास केला. भात शेतीत चारसुत्री, एस आर टी, एस आर आय या सुधारीत लागवड पद्धतींचा अवलंब करत त्यांनी भात शेती फायद्याची केली. शेतीत केलेले बदल भात उत्पादन दुपटीने वाढवत आहेत हे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बायफ मार्फत स्थापित आदिवासी महिलांचे स्वयंसहायता समूह यांच्या मदतीने भात लागवडीचे हे तंत्रज्ञान गावोगावी नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अभ्यास सहली, शेतकऱ्यांच्या भेटी, गटचर्चा ,महिला मेळावे ,शेतकरी मेळावे पीक प्रात्यक्षिके,यांच्या माध्यमाने त्यांनी भात लागवडीच्या या तीनही तंत्रज्ञानाचा आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसार केला आहे.

shantabai dhonde (6)
धांडे मावशींनी आपल्या शेतात भात लागवडीचे चारसूत्री एस आर आय आणि एस आर टी या तीनही पद्धतींचा अभ्यास करून भात लागवडीस सुरुवात केली. आपले शेत संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकविले जावे ही त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी सर्वप्रथम गांडूळ खत निर्मिती आपल्या घराच्या अंगणात सुरू केली. त्यानंतर सर्वप्रथम चारसूत्री पद्धतीचा अवलंब करून भात लागवड सुरुवात केली यासाठी बायफच्या कृषी तज्ञांनी त्यांना मदत घेतली आहे. चारसूत्री पद्धतीने प्रथमच या भागांमध्ये भात लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि वर्ष २०१४ मध्ये त्यांना सुमारे ३३ टक्के उत्पादनात वाढ झाल्याचे निदर्शनास आले. या अनुभवानुसार त्यांनी त्यांच्या संपूर्ण भात शेतीमध्ये बदल घडवून आणला. चारसूत्री सोबतच जी जंगलांना लागून आणि पाणी न थांबणारी भात खाचरे आहेत त्यामध्ये एस आर टी आणि एस आर आय या सुधारित भात लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब त्यांनी केला. त्यापासूनही त्यांना उत्पन्नात दुपटीने वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या विशेष कार्याने आणि शेती तंत्रज्ञानाच्या प्रसाराने परिसरातील गरीब आदिवासी शेतकऱ्यांचे भात उत्पादन दुपटीने वाढण्यास मदत झाली आहे. त्या स्वतः इंद्रायणी, फुले समृद्धी जिरवेल, आंबेमोहर, काळ भात इत्यादी सुवासिक वाणांची लागवड करतात. त्यामुळे त्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. त्यांचे भात लागवडीचे प्रयोग बघण्यासाठी दूरवरून शेतकरी येत असतात यामध्ये जव्हार, वाडा, विक्रमगड, डहाणू जुन्नर, आंबेगाव,पेठ, सुरगाणा हरसुल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी इत्यादी तालुक्यांचा समावेश होतो. त्यांना कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांचेकडून ही तांत्रिक मार्गदर्शन व मदत मिळाली आहे.

 

 


Tags: preranaप्रेरणाशांताबाई खंडू धांडे
Previous Post

राम मंदिरासाठी सर्वात मोठी देणगी काँग्रेसचे ‘हे’ मुख्यमंत्री असलेल्या राज्यातून!

Next Post

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा काँग्रेसचा आरोप

Next Post
maratha

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा काँग्रेसचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!