Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या सरकारी बातम्या

सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील जलसंवर्धनाची कामे त्वरित पूर्ण करावी

मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे निर्देश

February 17, 2022
in सरकारी बातम्या
0
Shankarrao Gadakh instruction on Water conservation works in Sindhudurg and Ratnagiri

मुक्तपीठ टीम

 सिंधुदूर्ग, रत्नागिरी, राजापूर आणि विशेष बाब म्हणून तिवरे गावातील धरणांची नवीन आणि दुरूस्तीची कामे तातडीने करावीत. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत दुरुस्तीकरिता प्रस्तावित कामे व इतर योजनांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन जलसंधारणाची कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

 

मंत्रालयात शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांच्या प्रलंबित कामांबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार विनायक राऊत, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, योगेश नाईक, वैभव नाईक, राजन साळवी, शेखर निकम, जलसंधारण विभागाचे अप्पर आयुक्त सुनिल कुंभारे, सहसचिव दिलीप प्रक्षाळे आदिसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरू असलेली धरण आणि कालवे संदर्भातील कामे पूर्ण करण्याची मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी केली.

         

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात शासन निधीअंतर्गत १४ योजना व महामंडळ निधीअंतर्गत ५४ अशा एकूण ६८ योजना प्रगतीपथावर आहेत. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहाघर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यातील जलसंवर्धनाची सुरू असलेली कामे पूर्णत्वास न्यावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासन निधीअंतर्गत सहा योजना व महामंडळ निधीअंतर्गत १८ योजना अशा एकूण २४ योजना प्रगतीपथावर असून, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यातील कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे पूर्णत्वास न्यावीत, असे निर्देश शंकरराव गडाख यांनी दिले.

 

या योजना पूर्ण झाल्यानंतर ११ हजार ९३६०० हेक्टर सिंचनक्षमता निर्माण होऊन १ लाख ८१ हजार ३५८ स.घ.मी. पाणीसाठा निर्माण होणार असून, स्थानिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. कणकवली येथील लघु पाटबंधारे योजनेचे निम्म्यापर्यंत असून, आजतगायत रु. ३ हजार ३५२ लक्ष खर्च झालेला असून स्विकृत निविदा कालावधीनुसार सन २०२३-२४ मध्ये योजनेचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे मंत्री श्री.गडाख यांनी सांगितले.

 

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकुण १५ योजनांची दुरुस्ती प्रस्तावित असून ७ योजनांना शासनामार्फत प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. दरसूची व स्वामित्व धन मधील वाढ झाल्याने ३ अंदाजपत्रके शासनाकडे सुधारित प्रशासकीय मान्यतेकरीता प्रस्तावित केली आहे. ११ योजनांना शासनामार्फत मान्यतेची प्रक्रिया शासन स्तरावर प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


Tags: Minister Shankarrao GadakhratnagiriSindhudurgमंत्री शंकरराव गडाखरत्नागिरीसिंधुदूर्ग
Previous Post

मुंबईत तांदुळ महोत्सव! वाडा कोलम, इंद्रायणी, घनसाळ, रंगीत असे ४० वाणांचे तांदूळ!

Next Post

भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांना आवाहन

Next Post
maha bhumi abhilekh

भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!