Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“जे मुघलांना जमले नाही, ते आघाडी सरकारने करून दाखवलं!”

विश्व हिंदू परिषदेच्या शंकर गायकरांची टीका

July 15, 2021
in घडलं-बिघडलं
0
wari

मुक्तपीठ टीम

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने पालखी सोहळ्यावर दडपशाही पध्दतीने जाचक प्रतिबंध लादले आहेत. रेल्वे, एसटी, बाजारपेठा सुरु ठेवून फक्त पालखी सोहळ्यावर निर्बंध घालून वारकरी सांप्रदायाच्या भावना दुखविण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ किर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांची नजर कैदेतून सुटका करावी. मानाच्या पालखी सोबत किमान दहा वारकऱ्यांना कोरोनाचे नियम पाळून सहभागी होण्याची परवानगी द्यावी. या वारकरी सांप्रदायाच्या माफक मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. जे मुघलांना, इंग्रजांना जमले नाही ते महाविकास आघाडी सरकारने करुन दाखविले. याविषयी नागरीकांमध्ये जाऊन जगजागृती करण्यासाठी शनिवारी (१७ जुलै) राज्यभरातील वारकरी आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते राज्यातील सर्व गावांमध्ये मंदिरांबाहेर, सरकारी कार्यालयासमोर बसून नागरीकांचे प्रबोधन करतील. यानंतर उद्‌भवणाऱ्या परिस्थितीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांचे सरकार जबाबदार राहिल, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र, गोवा क्षेत्रमंत्री शंकर गायकर यांनी केले.

 

गुरुवारी (१५ जुलै) चिंचवड गावात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायकर बोलत होते. यावेळी वारकरी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष हभप पांडूरंग शास्त्री शितोळे महाराज, चिंचवड अध्यक्ष शरद इनामदार, विजयराव देशमुख, विभाग मंत्री नितीन वाटकर, जिल्हा मंत्री संजय शेळके, चिंचवड कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, बजरंग दलाचे विभाग सह संयोजक कुणाल साठे, बजरंग दलाचे विभाग संयोजक संदेश भेगडे, पुणे ग्रामिण जिल्हा मंत्री दयानंद शिंदे आदी उपस्थित होते.

 

शंकर गायकर म्हणाले की, मागील वर्षी राज्यातील संतांनी, वारकऱ्यांनी आपल्या धर्मशाळा कोरोना नियंत्रणासाठी शासनाला उपलब्ध करुन दिल्या आणि आता शासनाचे कर्मचारी वीजबील थकले म्हणून या धर्मशाळेंचा वीजपुरवठा खंडीत करीत आहेत. पालकमंत्र्याचे मेळावे, लग्न सोहळे सुरु आहेत. परंतू सातशे वर्षांची वारीची परंपरा खंडीत करुन सरकारने वारकऱ्यांच्या भावना दुखविल्या आहेत. वारकरी शासनाने घातलेले सर्व नियम पाळून, दहा वारकऱ्यांमध्ये रात्री प्रवास करुन, माळरानावर मुक्काम करुन पंढरपूरात विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन, चंद्रभागेत स्नान करण्याची मागणी करीत आहेत. याला परवानगी देण्याऐवजी राज्य सरकार दडपशाही पध्दतीने जाचक नियम टाकून प्रतिबंध करीत आहे. कोरोना काय फक्त वारकऱ्यांमुळेच वाढतो का? असा प्रश्न गायकर यांनी सरकारला विचारला आहे. तसेच आषाढी एकादशीपासून महाराष्ट्रात विविध मठांमध्ये, मंदिरांमध्ये चार्तुमासनिमित्त पारंपरिक उत्सव, वारकरी सप्ताह, किर्तन, प्रवर्चन, दर्शनास असणारे प्रतिबंध दुर करावे. अशीही मागणी गायकर यांनी केली.

 

वारकरी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष हभप पांडूरंग शास्त्री शितोळे महाराज म्हणाले की, सरकारचे मंत्री फक्त राजकारणापुरते संतांचे नाव घेतात. वारक-यांचे कपडे उतरविण्याचे काम हे सरकार करीत आहेत. वारकऱ्यांना नजर कैदेत ठेवून वारकरी सांप्रदायाच्या भावना दुखविणाऱ्या या सरकारच्या मुख्यमंत्र्याना पंढरपूरला दर्शनासाठी जाण्याचा नैतिक अधिकार नाही.

 

२००६ ला कराडमध्ये जाऊन बंडातात्या कराडकर यांना उध्दव ठाकरे यांनी ‘शिवसेना वारक-यांसाठी काहीही करायला तयार आहे’ असे आश्वासन दिले होते. तेच उध्दव ठाकरे आता मुख्यमंत्री असतानाही बंडातात्यांना नजर कैदेत ठेवतात. हि महाराष्ट्राची शोकांतिका आहे. वारकरी काय आतंकवादी आहेत काय? वारकऱ्यांच्या श्रध्देला आणि भावनेला सरकार आळा घालत असेल तर वारकरी विद्रोह करतील. बंडातात्यांना सन्मानाने नजरकैदेतून मुक्त करावे आणि त्यांना वारी करुन द्यावी. तसेच वारक-यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशीही मागणी हभप पांडूरंग शास्त्री शितोळे महाराज यांनी यावेळी केली.

 

हेही वाचा: महाराष्ट्रात पायी वारीसाठी आक्रमक, उत्तराखंडमध्ये मात्र भाजपा सरकारकडून पारंपरिक कावड यात्रा रद्द!

महाराष्ट्रात पायी वारीसाठी आक्रमक, उत्तराखंडमध्ये मात्र भाजपा सरकारकडून कावड यात्रा रद्द!


Tags: chief minister uddhav thackerayज्येष्ठ किर्तनकार हभप बंडातात्या कराडकरपालखी सोहळामहाराष्ट्रमहाविकास आघाडी सरकारमुख्यमंत्री उध्दव ठाकरेराज्य सरकारवारकरी सांप्रदायवारकरी सेवा फाऊंडेशनविश्व हिंदू परिषद
Previous Post

“…तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार करतोय”

Next Post

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते, पण नव्या रुग्णांचे प्रमाण कमी नाही!

Next Post
MCR 1-5-21

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते, पण नव्या रुग्णांचे प्रमाण कमी नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!