Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील त्रुटी दूर करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार”: शंभूराज देसाई

October 5, 2021
in घडलं-बिघडलं
0
Shambhuraj Desai

मुक्तपीठ टीम

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या डीसीपीएस योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींचा अभ्यास करून संघटनांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

 

मंत्रालयातील परिषद सभागृह येथे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या त्रुटींसंदर्भात गठीत करण्यात आलेल्या अभ्यासगटाचे अध्यक्ष तथा वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, लेखा व कोषागारे संचालक जयगोपाल मेनन, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर व अभ्यासगटाचे राज्यातील पंधरा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या (NPS) पूर्वीच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना – DCPS अंमलबजावणीतील त्रुटीं ज्या संघटनांनी सादर केल्या आहेत त्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल.

 

या बैठकीत अभ्यासगटातील सदस्यांनी त्यांचे म्हणणे विस्तृत स्वरूपात समितीसमोर मांडले.राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या सभासदांचे हप्ते जमा होत नसल्याबाबत (Missing Credits) बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. संघटनेच्या मागण्यांबाबत शासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचनाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. कोरोनाचे संकट असूनही कोरोनाबाबतचे नियम पाळून सर्व संघटना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीला आमंत्रित केल्याबाबत सर्व संघटनांनी वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे विशेष आभार मानले.

 


Tags: ajit pawarchief minister uddhav thackeraycoronaNPSshambhuraj desaiकोरोनाशंभुराज देसाई
Previous Post

“मुंबईतील ६ किल्ल्यांसाठी एकत्रित विकास आराखडा तातडीने तयार करावा”

Next Post

राज्यात २,४०१  नवे रुग्ण, २,८४० रुग्ण घरी! बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले!!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात २,४०१  नवे रुग्ण, २,८४० रुग्ण घरी! बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!