शैलेश गावंडे
मित्रहो मागील आठ वर्षात ह्या देशाच्या लोकशाही मध्ये अभूतपूर्व बदल झाला आहे. भारत देशाची वाटचाल लोकशाही कडून हुकूमशाही कडे होते की काय आहे म्हणजे अतिशयोक्ती ठरेल पण चिन्ह तसेच दिसत आहे(जरी हे एवढे सोपे नसले तरी). लोकशाही चा महत्वाचा स्तंभ तो म्हणजे टीव्ही मीडिया हा सरकारसाठी काम करतो आहे चित्र सध्या आहे. वर्तमानपत्र काही अंशी स्वतंत्र दिसत असली, प्रेशर त्यांच्यावरही आहे. आता उरला तो सोशल मीडिया जो आत्तातरी सरकारी नियंत्रणाबाहेर आहे. कारण युटुब, ट्विटर, फेसबुक ह्या कंपन्या भारताबाहेरील आहेत.
तरीपण सोशल मीडिया हा खूप प्रमाणात सत्ताधारी लोकांकडून प्रभावित केलेला आहे आहे. आयटी सेलमध्ये पगारावर काम करणारे लोक, टूल किट, प्रपोगांडा मशिनरी, पेड इन्फ्ल्यून्सर, विकत घेतलेले गोदी पत्रकार ह्यांच्या माध्यमातून हवा तसा प्रोपोगंडा चालवून सरकार आणि विशिष्ट व्यक्ती कसे सर्वश्रेष्ठ आहेत, हे ठसवण्याचा जीवतोड प्रयत्न करत असतात.
मग ह्यात आपल्यासारखे सुजान नागरिक काय करू शकतात चुकीच्या पोस्ट बघायच्या आणि म्हणायचं ,”अरे हे किती चुकीचं लिहिलं आहे” असं हळहळायचं आणि गप्प बसायचं का?
हे लक्षात घ्या, डिजिटल विश्वामध्ये मतेमतांतरं हे बऱ्यापैकी डिजिटल मीडियावर काय चाललय ह्यावरून ठरवल्या जातात. आजकाल राजकीय पार्टी चे कार्यकर्ते पण एका छोट्याशा मोबाईल वरून पक्षाचे काम करत असतात. काही देशप्रेमी कार्य, आंदोलन, धरणे हे आता स्वतः जाऊनच केले पाहिजे असे नाही आणि तेवढा वेळही कोणाकडे नाही.
मग कमीत कमी घरी बसून आपल्या मोबाईल लॅपटॉप वरून आपण काय करू शकतो?
चुकीच्या माहितीवर आपले मत व्यक्त करून (कॉमेंट) त्या माहितीला दुरुस्त तर करू शकतो. काही सकारात्मक पोस्ट तर नक्कीच करू शकतो, किंवा अशी पोस्ट तयार करू शकत नसल्यास चांगली खरी पोस्ट पुढे तरी पाठवू म्हणजे forward करू शकतो. नाही काही जमलं तर किमान लाईक तरी करी शकतो.
अजून एक महत्वाचे, प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्मवर Report असा एक ऑप्शन असतो. चुकीची, फेक माहिती आढळल्यास फेक, चुकीचे म्हणून रिपोर्ट तर नक्कीच करू शकतो. या छोट्या छोट्या कृती जरी असल्या तरी जेव्हा सगळे सुजाण नागरिक हे जेव्हा एकत्रितपणे करतील ह्याचा प्रभाव खूप मोठा होईल. सत्ताधारी पक्षाचा चुकीचा प्रोपोगंडा रोखण्यासाठी आणिच खरी माहिती लोकांपर्यंत पोहचण्यासाठी या कृतींची खूप मदत होईल.
या निमित्ताने अजून एक सूचना देऊ शकतो, ती म्हणजे थोडे गोदी मीडिया पासून हटून यूट्यूबवरील स्वतंत्र पत्रकारांचे निःपक्षपाती चॅनल, व्हिडिओ येत असतात, ते बघून, फॉलो करून आपण खरी माहिती मिळवू शकतो. तसेच अशा लोकांना सहयोग पण करू शकतो.
पण हे मात्र खरे, की जाऊद्या ना माझं काय जातं, मला काय करायचं, असा जर दृष्टीकोन ठेवला तर फेक शक्तींचं मात्र चांगलंच फावेल आणि त्यांचे खोटे काम हे निरंतर चालू राहील. या फटका देशाच्या भवितव्याला नक्कीच बसेल.
लेखक शैलेश गावंडे हे पुणे(ह. मु. जर्मनी) येथील विविध आंतराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केलेले अनुभवी आय टी अभियंता आहेत. ते भारतीय राजकीय घडामोडीवर बारकाईन लक्ष ठेऊन असतात.