Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयाच्या पेगासस निकालानंतर भाजपाची मागणी: “राहुल गांधींनी देशाची माफी मागावी!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pegasus

मुक्तपीठ टीम

पेगासस हेरगिरी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने २९ पैकी ५ मोबाइलमध्ये मालवेअर आढळले असून पेगासस हेरगिरीचे ठोस पुरावे आढळले नसल्याचे म्हटले. सरन्यायाधीश एनव्ही रमण, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावर आता भाजपाने या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला असून त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

भाजपाचा राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा!!

  • भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेतून काँग्रेसवर एकापाठोपाठ एक हल्ला चढवला.
  • या प्रकरणावर काँग्रेसने देशद्रोहाचा आरोप केला होता आणि पावसाळी अधिवेशन होऊ दिले नाही.
  • राहुल गांधी म्हणाले होते की पेगासस हा भारताची लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न आहे.
  • हा देशाच्या संस्थांवर आणि देशावर हल्ला आहे.
  • त्यांनी असे वादळ निर्माण केले, मग आज काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी माफी मागतील का?
  • हे एका ठरवून केलेल्या मोहिमेनुसार घडलं आहे. या मोहिमेचा उद्देश पंतप्रधान मोदींना कमजोर करण्यासाठी बेताव वक्तव्यांचा होता.
  • खरे तर राहुल गांधी, काँग्रेसने आपल्या संलग्न संस्थांमध्ये पंतप्रधान मोदींबद्दल विष भरले आहे आणि ते त्यांचा अपमान करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात पण खोटेपणा फार काळ टिकत नसतो.

न्यायालयात आज काय घडले?

  • सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली.
  • खंडपीठासमोर तीन भागातील अहवाल आले आहेत.
  • त्यातील दोन अहवाल हे तांत्रिक समितीचा असून एक भाग हा सर्वोच्च न्यायालयाल निवृत्त न्यायाधीश आर. व्ही. रविंद्रन यांच्या समितीचा आहे.
  • या अहवालातील एक भाग सार्वजनिक करण्यात येणार असल्याचे खंडपीठाने म्हटले.
  • न्या. रविंद्रन यांच्या समितीने केलेल्या शिफारसी या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित होणार असल्याचे सरन्यायाधीश रमण्णा यांनी सांगितले.

Tags: BJPCongresspegasus spywareSupreme Courtकाँग्रेसपेगासस स्पायवेअरभाजपासर्वोच्च न्यायालय
Previous Post

सोशल मीडियातील फेकची भेसळ थांबवायची आहे? जास्त काही नको, एवढंच करा…

Next Post

मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची चौकशी, फडणवीसांच्या घोषणेचे उपाध्येंकडून स्वागत

Next Post
keshav upadhye welcome devendra fadanvis decision to enquire bmc scams

मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची चौकशी, फडणवीसांच्या घोषणेचे उपाध्येंकडून स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!