Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार – आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मदतीसाठी राज्य नियंत्रण तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Vijay Wadettiwar

मुक्तपीठ टीम

सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून  राज्यातील  अंदाजे १२०० विद्यार्थी युक्रेन देशात अडकले आहेत. त्यातील ३०० विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला आहे. राज्य नियंत्रण कक्ष या विद्यार्थ्यींशी संपर्कात असून महाराष्ट्र शासनाकडून या विद्यार्थ्यांना तसेच अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न  सुरू आहेत  अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

सिंहगड निवासस्थानी युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी तसेच नागरिकांसंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते.

 

नवी दिल्ली येथे हेल्पलाईन्स कार्यन्वित केल्या आहेत.केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली येथील क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.
● टोल फ्री – 1800118797
● फोन 011-23012113 / 23014104 / 23017905
● फॅक्स 011-23088124
● ईमेल situationroom@mea.gov.in

(5/5)

— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 25, 2022

 

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील अंदाजे १२०० विद्यार्थी अडकले असून ३०० विद्यार्थ्यांनी पालकांशी संपर्क साधला असल्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली आहे.युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती जिल्हास्तरावर देखील संकलित करण्याचे काम सुरू आहे.सर्व जिल्हाधिकारी यांनी देखील हेल्पलाईन नंबर जाहीर केलेले आहेत.  राज्याचा नियंत्रण कक्ष  022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर मोबाईल तसेच व्हॉटस क्रमांक ९३२१५८७१४३ आणि controlroom@maharashtra.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा.

विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील किती लोक अडकले  आहेत याची माहिती विभाग घेत आहे.तात्काळ संपर्क केंद्रही सुरू केले आहे. जी-जी मदत हवी असेल ती मदत देण्यासाठी राज्य सरकार  देण्यास तयार आहे .केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत.कदाचित युक्रेनमधून विमान उडू शकणार नाही. त्यामुळे बाजूच्या देशातून जर विमान घेतले तर त्यासाठी तयारी दर्शवली आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा स्तरावर संकलित करण्याची तयारी केली आहे. काही लोकांशी संपर्क होण्यात अडचणी येत आहेत. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयाने  नवी दिल्ली येथे  हेल्पलाईन्स कार्यन्वित केल्या आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली येथील क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

 

  • टोल फ्री – 1800118797
  • फोन 011-23012113 / 23014104 / 23017905
  • फॅक्स 011-23088124
  • ईमेलsituationroom@mea.gov.in या हेल्पलाईनवर संपर्क

 

साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Tags: RussiaUkrainevijay wadettiwarविजय वडेट्टीवार
Previous Post

मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग; कालबद्ध रीतीने इतर मागण्यांवरही कार्यवाही झाली पाहिजे

Next Post

राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे कामगार मित्र पुरस्कार प्रदान

Next Post
Maharashtra Governor presents Kamgar Mitra Puraskars

राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे कामगार मित्र पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!