Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्याच्या सीरमकडून ९२० मुलांवर होणार नव्या लसीची चाचणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
covovax

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भाकीत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल असेही अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातचं सीरमने लहान मुलांच्या लसीकरणासंबंधित एक चांगली बातमी दिली आहे. सीरम लवकरचं कोवोवॅक्स लशीची चाचणी ९२० लहान मुलांवर करणार आहे. त्यासाठी कंपनी लवकरचं ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे परवानगीसाठी अर्ज करणार असल्याची शक्यता आहे.

 

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी नोव्हावॅक्सने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी कोरोना लस बनविण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. कोवोवॅक्स नावाने नोव्हावॅक्सची कोरोना लस भारतात तयार केली जात आहे. सप्टेंबरपर्यंत सीरम ही लस भारतात आणण्याची योजना आखत आहे. भारतात त्याची ब्रिजिंग चाचणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, मुलांवर याची एक स्वतंत्र वैद्यकिय ​​चाचणी असेल आणि त्यामध्ये सर्व काही व्यवस्थित झाल्यावरच ती मुलांसाठी उपलब्ध होईल.

 

पुढील महिन्यात १० ठिकाणी चाचणी घेण्यात येईल-

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी सांगितले की ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ची परवानगी घेतल्यानंतर आम्ही पुढच्या महिन्यात १० ठिकाणी ९२० मुलांमध्ये पीडियाट्रिक ट्रायल सुरू करण्याचा विचार करीत आहोत.

 

सहा महिने पाळत ठेवली जाणार

  • पूनावाला म्हणाले की पीडियाट्रिक ट्रायल घेण्यात येणाऱ्या १० जागेत भारती हॉस्पिटलची वडू शाखा आणि पुण्यातील केईएम हॉस्पिटलचा समावेश आहे.
  • कोवोवॅक्सच्या दोन डोसच्या लसीकरणानंतर, सहा महिन्यांपर्यंत त्यांच्यावर पाळत ठेवली जाईल.

 

चाचणी अशाप्रकारे सुरू होईल

  • पूनावाला म्हणाले की, चाचणीच्या डिझाइननुसार, सुरुवातीला १२ – १७ वयोगटातील मुलांवर लशींची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर चाचणी घेण्यात येईल.
  • ते म्हणाले की आम्ही वयाच्या उलट क्रमाने चाचण्या सुरू करू.
  • पूनावाला म्हणाले की एसआयआय परवान्यासाठी तीन महिन्यांच्या प्रगत क्लिनिकल चाचणीनंतर सुरक्षा आणि प्रतिकारशक्तीवर अंतरिम चाचणी तपशील सादर करेल.
  • ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार कंपनी जागतिक चाचणी निकालाच्या आधारे चाचणी पूर्ण होण्यापूर्वी लस परवान्यासाठी अर्ज करू शकते.

Tags: Covovaxserum-instituteकोवोवॅक्ससीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
Previous Post

राज्यात नवे रुग्ण: सर्वाधिक कोल्हापूर- १९५२, सर्वात कमी नंदूरबार- फक्त १ !

Next Post

“वादाऐवजी संवाद, समाजाचा चोहोबाजूंनी विचार करणारा व्यक्तीच खरा नेता” -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
cm uddhav thackeray

"वादाऐवजी संवाद, समाजाचा चोहोबाजूंनी विचार करणारा व्यक्तीच खरा नेता" -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!