मुक्तपीठ टीम
सीरम इंस्टिट्यूटने बुधवारी कोविशिल्ड लसीचे नवीन दर जाहीर केले आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर नवे दर ठरवण्यात आलेचे सीरमकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोविशिल्ड लसीच्या नव्या दर पत्रकानुसार आता केंद्र सरकारला लस पूर्वीच्याच १५० रुपये दराने तर राज्याला पूर्वीपेक्षा २५० रुपये जास्त तर खासगी रुग्णालयांना ४५० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तसेच सीरमने उत्पादन केलेल्या लसींपैकी ५० टक्के केंद्र सरकारला तर उरलेल्या ५० टक्के राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना दिल्या जातील.
सीरमच्या कोविशिल्ड लसीचे नवे दर
- कोविशिल्ड लस खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांना दिली जाणार आहे. यापूर्वी ही रुग्णालयांना ही लस २५० रुपयांना दिली जात होती.
- राज्यांसाठी लसीचे दर ४०० रुपये असतील. यापूर्वी ती केंद्र सरकार पुरवत होते.
- केंद्र सरकारला मात्र पूर्वीप्रमाणेच १५० रुपयांना ही लस मिळणार आहे.
सीरमचे नवे दर पत्रक
सीरमने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन महिन्यांत लसीचे उत्पादन वाढविण्यात येईल. सध्या तयार होणार्या लस उत्पादनांपैकी ५०% लस केंद्र सरकारच्या लसीकरण कार्यक्रमासाठी पाठविली जाणार आहे. उरलेली ५० टक्के लस ही राज्य आणि खासगी रुग्णालयांना दिली जाणार आहे.
दरवाढीनंतरही कोविशिल्डच स्वस्त असल्याचा दावा सीरम इंस्टिट्युटने केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात विकल्या जाणाऱ्या लसींपेक्षा कोविशिल्ड भारतात स्वस्त आहे. अमेरिकेच्या लसीची किंमत १५०० रुपये तर चीनच्या लसीची किंमत ७५० रुपये आहे.
परदेशी लसींचे दर पत्रक
- अमेरिकेन लस १५०० रुपये
- चीनी लस ७५० रुपये
- रशियन लस ७५० रुपये