Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पंतप्रधानांच्या आवाहनानुसार भाजपाचे राज्यात नव्या जोमाने सेवाकार्य”

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

April 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
Chandrakant Patil

मुक्तपीठ टीम

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना कोरोनाच्या संकटात देशवासियांनी अधिकाधिक संख्येने पुढे येऊन गरजूंना मदत करावी, असे आवाहन केले असून त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे राज्यातील कार्यकर्ते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या जोमाने अधिक व्यापक सेवाकार्य करतील, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

 

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी मोठे सेवाकार्य केले होते. शहरी आणि ग्रामीण भागात सर्वत्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जनतेला थेट मदत केली होती. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर सेवाकार्याची योजना पक्षाच्या पदाधिकारी – लोकप्रतिनिधींच्या ऑनलाईन बैठकीत नुकतीच निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मा. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आता हे सेवाकार्य अधिक जोमाने आणि व्यापक करण्यात येईल.

 

त्यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य निर्बंध पाळले जावेत, यासाठी स्थानिक पातळीवर विविध सोसायट्या – गल्ल्यांमध्ये युवकांनी ‘कोरोना अनुशासन कमिट्या’ बनवाव्यात अशी महत्त्वाची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या स्थानिक समित्या बनवून लोकांना मदत करण्यासाठी पक्षाचा युवा मोर्चा पुढाकार घेईल व अत्यंत प्रभावी कार्य करेल.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या संकटावर आपण कशा प्रकारे मात करू शकतो याचा नेमका उपाय सांगितला आणि जनतेला धीर दिला. आर्थिक चक्र चालू ठेऊन लोकांची रोजीरोटी वाचवायची आणि त्याचवेळी कोरोनावर मात करायची याचा मार्ग त्यांनी दाखविला. त्या मार्गाने देश यशस्वी होईल. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी सामना केला. त्याच पद्धतीने दुसऱ्या लाटेचाही सामना करू, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

 


Tags: BJPchandrakant patilcoronaprime minister narendra modiकोरोना
Previous Post

#मुक्तपीठ बुधवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post

सीरमची लस महागली…केंद्राला १५०, राज्याला ४००, तर खासगी रुग्णालयांना ६००!

Next Post
Serum covishield

सीरमची लस महागली...केंद्राला १५०, राज्याला ४००, तर खासगी रुग्णालयांना ६००!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!