Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनानं काँग्रेसी, जगण्यात धारावी! एकनाथ गायकवाडांचं निधन…

April 28, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
eknath gaikwad

मुक्तपीठ टीम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन झालं. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात आपला अखेरचा श्वास घेतला.

एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. आज सकाळी दहा वाजता कोरोनामुळे त्यांचं निधन झाले. निधनामुळं काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त केलं जात आहे. काळ बदलला, काँग्रेसही बदलली, पण एकनाथ गायकवाड मात्र मनानं कायम काँग्रेसीच राहिले. त्यांचं जगणंही कायम राहिलं ते त्यांच्या धारावीसाठी. त्यांचा श्वास आणि ध्यास हा फक्त आणि फक्त धारावीच होता.

एकनाथ गायकवाड ठळक माहिती

  • मुंबई, महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेते
  • कुठल्याही वादात न पडता शांतपणे राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत
  • कायम काँग्रेस आणि फक्त काँग्रेसलाच आपलं सर्वस्व मानत.
  • मुंबईतील धारावी भागात त्यांच्या राजकारणाचे केंद्र होते.
  • धारावीतील झोपडपट्टीवासीयांच्या कल्याणासाठी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले.
  • काँग्रेसतर्फे ते विधानसभेवर धारावी मतदारसंघातून निवडून गेले होते.
  • राज्याच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते.
  • धारावी भाग असलेल्या उत्तर मध्य मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते.
  • शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना लोकसभा निवडणुकीत पराभत केल्यापासून त्यांना जायंट किलर म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही होते.
  • त्यानंतर शिवसेनेचे राहूल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता.
  • लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही गायकवाड स्वस्थ बसले नाहीत.
  • प्रतिकुलतेतही त्यांनी त्यांची कन्या वर्षा गायकवाड यांना धारावीतून विधानसभेवर निवडून आणले.
  • त्यानंतरही ते सतत काँग्रेसच्या विचारधारेला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी कार्यरत होते.

एकनाथ महादेव गायकवाड यांची कारकीर्द

जन्म – १ जाने १९४० ,सातारा
मुले – २ मुली व २ मुले

आमदार मतदारसंघ – धारावी
१) १९८५-९०
२) १९९०-९५
३) १९९९-२००४
१९९३-९५- राज्यमंत्री
१९९९-२००४ – राज्यमंत्री , आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार, उच्च व तंत्र शिक्षण अशी विविध खाती त्यांनी भुषविली होती

खासदार
१)२००४ -२००९
२) २००९-२०१४
मुंबई काँग्रेस अध्यक्ष- २०१७-२०२०


Tags: coronaEknath Gaikwadmumbaivarsha gaikwadएकनाथ गायकवाडकाँग्रेसजायंट किलरमुंबईवर्षा गायकवाड
Previous Post

आता घरातही मास्क घालण्याचा सल्ला कशासाठी?

Next Post

पंतप्रधान मोदींनी जे नको म्हटलं तेच घडणार? देशातील १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा प्रस्ताव!

Next Post
narendra modi

पंतप्रधान मोदींनी जे नको म्हटलं तेच घडणार? देशातील १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा प्रस्ताव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!