मुक्तपीठ टीम
निफाड तालुक्यातील कुरुडगाव शिवारात ऊसतोड कामगार हे ऊस तोडत असताना त्यांना बिबट्याचे बछडे आढळले या कामगारांनी चक्क या बिबट्याच्या बछड्याला उचलून घेत त्याच्या सोबत सेल्फी काढले एवढ्यावरच हे कामगार न थांबता त्यांनी काढलेले फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल केले मात्र या कामगारांनी बिबट्याच्या बछड्या सोबत सेल्फी काढत असताना परिसरात असलेल्या बिबट्याच्या मादीला हा प्रकाराला नजरेस आला असता तर नक्कीच मोठा अनर्थ घडला असता.
तरी बिबट्या बछड्या सोबत सेल्फी काढणाऱ्या ऊस तोड कामगार विभागाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसून वन विभाग काय कारवाई करते याकडे प्राणी मित्रांचे लक्ष लागून असून तरी अशा प्रकारचे प्राण्या सोबत सेल्फी फोटोसेशन करू नये असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
फोटोसेशन झाल्यानंतर या बिबट्याच्या बछड्यांना परत ऊसतोड कामगार उसाच्या शेतात सोडून दिले असले तरी आपला जीव धोक्यात घालून बिबट्यासोबत सेल्फी काढू नये, असे आव्हान वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.