Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“बाल हक्क शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग होण्यासाठी प्रयत्न करणार”

महिला व बाल विकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांचे प्रतिपादन

February 2, 2021
in सरकारी बातम्या
0
yashomati

मुक्तपीठ टीम

 

बाल हक्क हा विषय शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत बाल न्याय कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, बाल कल्याण समितीचे काम लोकाभिमुख करणे तसेच बालगृहातील मुलांना आश्वासक भविष्य देण्यासाठी महिला व बाल विकास विभाग कटिबद्द असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. महिला व बालकल्याण क्षेत्रातील तज्ञ, समाजसेवी संस्थांचे योगदान मोलाचे असल्याचेही अॅड.ठाकूर म्हणाल्या.

 

महिला व बालकांच्या विकासाचे प्रश्न, धोरण, कायदे, कल्याणकारी उपक्रम व सध्या सुरु असलेल्या योजनांचा सखोल अभ्यास करुन त्यांची अंमलबजावणीच्या अनुषंगाने सूचना करण्यासाठी विविध क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या शासकीय/अशासकीय सदस्यांची मार्गदर्शक समिती महिला व  बाल विकास विभागाने स्थापन केली आहे. या समितीची पहिली बैठक आज मंत्री अॅड.ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महिला व बालविकास आयुक्त ऋषिकेश यशोद, समितीचे सदस्य अॅड.निर्मला सामंत प्रभावळकर, अॅड. विजया बांगडे, येसूदास नायडू, आँड्रे डिमेलो, तारिक मोहम्मद, श्रद्धा बेलसरे, विजय राघवन, रवी आंबेकर, अल्पा वोरा, अनिरुद्ध पाटील, ज्योती नाले, परिषा सरनाईक उपस्थित होते.

 

बाल न्याय कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या अडचणी, बालगृहातील मनुष्यबळाला प्रशिक्षणाची गरज, सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी, सोयी सुविधांच्या कमतरतांमुळे बालकांना तसेच कर्मचाऱ्यांना ताणतणावाचा सामना करावा लागतो याबाबत यावेळी चर्चा कऱण्यात आली. जिल्हा स्तरावर कार्यरत असलेल्या बाल कल्याण समिती मुलांच्या संरक्षण, पोषण आणि पुनर्वसनात महत्वाची भूमिका बजावतात, मात्र या समित्यांचे उत्तरदायित्व स्पष्ट होणे, कामाचे मुल्यमापन होणे गरजेचे आहे. परराज्यातील मुलांची महाराष्ट्रातून सुटका केल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाचा पाठपुरावा, शोषण पिडित बालिकांचे आधार गृहातील समुपदेशन, अनाथालयातून बाहेर पडणाऱ्या मुलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण करणे आदीबाबत चर्चा करण्यात आली.

 

स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनीधी, तज्ञ यांनी प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणीबाबत अवगत केले. या सगळ्याबाबत शासन सकारात्मक असून तातडीने यावर कार्यवाही केली जाईल असे यावेळी आयुक्त ऋषिकेश यशोद यांनी आश्वस्त केले.

 

 


Tags: Minister for Women and Child Development Adv. Yashomati Thakurअॅड. यशोमती ठाकूरमहिला व बाल विकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर
Previous Post

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या मतदार याद्या ११ फेब्रुवारीला

Next Post

बिबट्याच्या बछड्यासोबत ऊसतोड कामगारांचा सेल्फी

Next Post
leopard calves

बिबट्याच्या बछड्यासोबत ऊसतोड कामगारांचा सेल्फी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!