पाऊस पडतो. धरतीला भिजवतो. त्यातून अंकुरतात बीजं. त्यातून बहरतो निसर्ग. त्यासाठीच एक पर्यावरणस्नेही उपक्रम बीज म्हणजे सीड बॉल्सचा. मुंबईच्या मालाड या पश्चिम उपनगरातील मालवणीमधील राष्ट्र सेवा दलाचे निसार अली सय्यद,मनोज परमार,नमिता मिश्रा,मेरी चेट्टी,वैशाली महाडिक,आदीच्या पुढाकाराने सीड बॉल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आंबा, सीताफळ, जांभूळ आदी फळबिया जमा करून मातीच्या साह्याने हजार एक सीड बॉल तयार करण्यात आलेले आहे.पहिल्या पावसात आरे कॉलनी,संजय गांधी उद्यान येथे या सीड बॉल्सचे रोपण केले जाईल.