Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशाला सुरक्षा पुरवणारे आता सौरऊर्जाही पुरवणार!

 सौरऊर्जा महामंडळाचा केंद्रीय गृह मंत्रालयासोबत सामंजस्य करार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
solar energy

मुक्तपीठ टीम

देशाला सुरक्षा पुरवणारी केंद्रीय सुरक्षा दलं आता सौरऊर्जाही पुरवणार आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या (एनएसजी) परिसरांमधील छतावर सौरऊर्जा प्रणाली बसवल्या जाणार आहेत. त्यांच्या परिसरात उपलब्ध सौरऊर्जेच्या क्षमतेचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतीय सौरऊर्जा महामंडळाने (एसईसीआय) त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे. केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला आणि नवीन आणि नवीकरणीय मंत्रालयाचे सचिव इंदू शेखर चतुर्वेदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव राकेश कुमार सिंह आणि भारतीय सौरऊर्जा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक सुमन शर्मा यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भारताच्या हवामान वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दृष्टीने, भारत सरकारची सेवा करण्याचा भारतीय सौरऊर्जा महामंडळाला आनंद होत आहे आणि सौर प्रणालीच्या माध्यमातून छतावरील सौर ऊर्जा वापर क्षेत्राचा, देशाच्या दुर्गम भागात कानाकोपऱ्यात विस्तार करण्यासाठी महामंडळ उत्सुक आहे, असे सुमन शर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितले.

हा सामंजस्य करार देशाच्या सुरक्षा दलांना हरित उर्जा उपलब्ध करून देण्याच्या आणि शाश्वत भविष्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. हा सामंजस्य करार नवीकरणीय ऊर्जा सेवा कंपनी मॉडेल अंतर्गत छतावरील सौर ऊर्जा प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी गृह मंत्रालयाला सहाय्य करेल.

भारतीय सौरऊर्जा महामंडळ (एसईसीआय) हे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. हे महामंडळ विशेषत: सौर ऊर्जा, ऊर्जा व्यापार, संशोधन आणि विकास इत्यादीसह विविध नवीकरणीय ऊर्जा संसाधनांचा प्रसार आणि विकासासाठी कार्यरत आहे. भारतीय सौरऊर्जा महामंडळ हे व्यवहार्यता अंतर निधी (व्हीजीएफ) योजना, आंतरराज्य पारेषण प्रणाली (आयएसटीएस) योजना, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (सीपीएसयू) योजना इत्यादी अनेक सरकारी नवीकरणीय ऊर्जा योजनांसाठी नियुक्त केलेली अंमलबजावणी संस्था देखील आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: good newsmuktpeethNational Security GuardReconciliation AgreementSolar EnergySolar Energy CorporationUnion Home MinistryUnion Home Ministry Joint Secretary Rakesh Kumar Singhकेंद्रीय गृह मंत्रालयकेंद्रीय गृहमंत्रालय सहसचिव राकेश कुमार सिंहचांगली बातमीमुक्तपीठराष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलसामंजस्य करारसौरऊर्जासौरऊर्जा महामंडळ
Previous Post

खरोखरच आरे-वारे! रत्नागिरीत अनुभवा झिप लाईनचा तुफानी अंदाज!

Next Post

एमजी मोटरची सुपरफास्ट विक्री, भारतात विकल्या एक लाखापेक्षा जास्त गाड्या!

Next Post
MG Motor

एमजी मोटरची सुपरफास्ट विक्री, भारतात विकल्या एक लाखापेक्षा जास्त गाड्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!