Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लोकहितांचे प्रकल्प, स्थानिकांच्या विकासाला गती देण्यासाठी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा महत्वपूर्ण- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 4, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
मा मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सागरी किनारे बैठक 1

मुक्तपीठ टीम

‘पर्यावरण रक्षण हे आपले कर्तव्यच आहे. पण लोकहितांचे विविध प्रकल्प तसेच स्थानिकांच्या विकासाला गती मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा महत्वपूर्ण ठरेल,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र सागरी किनारा विकास प्राधिकरणाने तयार केलेला किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सादर करण्यात आला. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीचा हा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा केंद्रीय पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडे पाठवण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

मंत्रालयात समिती सभागृहात झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीस महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणु गोपाल रेड्डी, पशु संवर्धन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यावरण विभागाचे संचालक नरेंद्र टोके आदी उपस्थित होते.

पर्यावरण विभागाचे सचिव दराडे यांनी पाच जिल्ह्यांकरिताच्या आराखड्याचे सादरीकरण केले. किनारपट्टी क्षेत्राचे नियमन अधिनियमन-२०१९ नुसार हा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. त्यामध्ये चेन्नईच्या नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेने किनारपट्टीच्या क्षेत्राचे भरती व ओहोटी रेषेचे आलेखन केले. त्यावर पाच जिल्ह्यातून सूचना व हरकती मागवून हा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. यात सागरी नियमन क्षेत्राचे चार प्रकारात वर्गीकरण आहे. त्यामध्ये परिस्थितीकी दृष्ट्या संवेदनशील, विकसित भाग, ग्रामीण भाग आणि पाण्याचा भाग यांचा समावेश आहे. यात पुर्वीच्या २०११ च्या अधिसुचनेतील भरती रेषेपासूनची १०० मीटर अंतरापर्यंतची मर्यादा आता खाडी, नद्या, नाले या क्षेत्रांकरिता ५० मीटर पर्यंत करण्यात आली आहे.

यामुळे या पर्यटन उपक्रमांनाही चालना मिळणार आहे. स्थानिक मच्छिमारांना आणि पारंपरिक घरांच्या बांधकाम व दुरूस्तीची परवानगीची प्रक्रिया सुलभ होणार आहे. निवासी  घरांसाठी ३०० वर्ग मीटरपर्यंत बांधकामांसाठी स्थानिक नियोजन प्राधिकरण परवानगी देऊ शकेल, असे प्रस्तावित आहे.

तसेच स्थानिक लोकांची जूनी घरेही नियमित केली जाऊ शकणार आहेत. किनारपट्टीच्या भागामध्ये स्थानिक नागरिकांकरिता सामुदायिक पायाभूत सुविधा उभे करणे शक्य होणार आहे. स्थानिक कोळी बांधवांच्या मासेमारी व पारंपरिक व्यवसायासाठी आवश्यक अशा वाळवण, मासळी बाजार, जाळी बांधणी, होड्यांची दूरूस्ती यांनाही परवानगी दिली जाणार आहे. किनारपट्टी भागात राहणाऱ्या स्थानिक लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून उदरनिर्वाहासाठी घरगुती मुक्काम पर्यटन सुविधा देता येणार आहे. तसेच पर्यटन क्षेत्रासाठीच्या आवश्यक अशा समुद्रकिनारा शॅक (खोपटी), प्रसाधनगृहे, बैठक व्यवस्था आदी तात्पुरत्या पर्यटन सुविधांना परवानगी देणे शक्य होणार आहे.


Tags: Chief Minister Eknath ShindeGovernment NewsLocal DevelopmentManagement PlanmuktpeethPublic Interest Projectsघडलं-बिघडलंमुक्तपीठमुख्यमंत्री एकनाथ शिंदेलोकहित प्रकल्पव्यवस्थापन आराखडासरकारी बातमीस्थानिक विकास
Previous Post

‘घोडगंगा’च्या पारदर्शी, लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य : किसान क्रांती पॅनेलचा निर्धार

Next Post

‘राष्ट्रवादी मंथन… वेध भविष्याचा’: राष्ट्रवादीचे शिर्डीत शिबीर…

Next Post
ncp

'राष्ट्रवादी मंथन... वेध भविष्याचा': राष्ट्रवादीचे शिर्डीत शिबीर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!