मुक्तपीठ टीम
येत्या २७ जानेवारीपासून मुंबईत पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. मुंबईत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झालेली होती, मात्र गेल्या ५ दिवसात कोरोना पुन्हा एकदा मंदावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच शाळा २७ जानेवारीपासून पुन्हा सुरु करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा एक ते दोन हजारांवर जाण्याची शक्यता!
- वाढत्या कोरोना रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करून राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
- यासोबतच रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
- रात्री संचारबंदी लावण्यात आली होती.
- मात्र, मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे.
- कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वीस हजारांवरून पाच हजारांवर आली आहे.
- अशा परिस्थितीत मुंबईत कोरोनाच्या तिसर्या लाटेचा उच्चांक संपल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- ही प्रकरणे आता कमी होत जातील.
- २६ जानेवारीपर्यंत मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा एक ते दोन हजारांपर्यंत घटण्याची शक्यता आहे.
कोरोना पॉझिटिव्हीटी रेट निम्म्यापेक्षाही घटला!
- ७ जानेवारीला मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले.
- त्या दिवशी मुंबईत सर्वाधिक नवीन कोरोना रुग्णांची संख्या २० हजार ९७१ होती.
- तर दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक रुग्ण संख्येची आकडेवारी ११,५७३ होती.
- मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
- मंगळवारी ६१४९ रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे.
- कोरोना पॉझिटिव्हीटी रेट देखील खाली आला असून ६ जानेवारीला २९.९ टक्के असणारा मंगळवारी १२.९ टक्क्यांवर आला होता.