Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्र सरकारचं ‘वन रँक, वन पेन्शन’ धोरण सर्वोच्च न्यायालयात टिकलं! भगतसिंह कोश्यारींच्या ‘या’ शिफारशीमुळेच झाला विरोध!!

March 16, 2022
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निवृत्त सैनिकांसाठीचं वन रँक वन पेन्शन (ओआरओपी) धोरण कायम ठेवले आहे. यात घटनात्मक कमतरता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पॉलिसीमध्ये पाच वर्षांत पेन्शनचा आढावा घेण्याची तरतूद असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे, सरकारने १ जुलै २०१९ पासून पेन्शनचा आढावा घ्यावा. निवृत्त सैनिकांची थकबाकी तीन महिन्यांत द्यावी, असे न्यायालयाने सरकारला सांगितले. सध्या महाराष्ट्रात राज्यपाल असलेल्या भगतसिंह कोश्यारी यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी नेमलेल्या समितीने पाच वर्षात पेन्शनबद्दल आढावा घेण्याची शिफारस केली होती. ती शिफारसच वादाचं मूळ आहे

 

सरकारच्या या निर्णयाला होत आहे विरोध…

  • खरे तर केंद्र सरकारने ७ नोव्हेंबर २०१५ रोजी वन रँक वन पेन्शन योजनेची (ओआरओपी) अधिसूचना जारी केली होती, ज्यामध्ये या योजनेचा आढावा पाच वर्षांनी घेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, परंतु माजी सैनिक संघटनेने मागणी केली होती की, एक वर्षानंतर त्याचा आढावा घ्यावा.
  • या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले.
  • याचिकाकर्ता इंडियन एक्स-सर्व्हिसमेन मूव्हमेंट (IESM) यांनी सरकारच्या २०१५ च्या वन रँक वन पेन्शन धोरणाच्या निर्णयाला आव्हान दिले होते.
  • त्यांचं म्हणणं होतं की, सरकारचा निर्णय मनमानी करणारा आणि दुर्दैवी आहे.
  • कारण यामुळे वर्गात एक आणखी वर्ग तयार होतो. प्रत्यक्षात एकाच रँकमध्ये वेगवेगळे पेन्शन देतो.

 

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, सूर्यकांत आणि विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने सांगितले की, वन रँक वन पेन्शन (ओआरओपी) बाबत केंद्राच्या निर्णयात कोणताही दोष नाही आणि आम्ही सरकारच्या धोरणात्मक बाबींमध्ये हस्तक्षेप करू इच्छित नाही. न्यायालयाने निर्देश दिले की सरकारने १ जुलै २०१९च्या तारखेपासून पेन्शनचे पुनरावलोकन करावे. ३ महिन्यांत थकबाकी द्यावी.

 

कोश्यारी समितीच्या शिफारशीलाच आहे विरोध

माजी सैनिक असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेत भगतसिंग कोश्यारी समितीने पाच वर्षांतून एकदा पुनरावलोकनाच्या सध्याच्या धोरणाऐवजी स्वयंचलित वार्षिक पुनरावृत्तीसह वन रँक-वन पेन्शन लागू करण्याची मागणी केली होती.


Tags: central govtOne PensionOne RankOROPSupreme Courtओआरओपीभगतसिंग कोश्यारी समितीवन रँक वन पेन्शनसर्वोच्च न्यायालया
Previous Post

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी व्हायचंय? ‘या’ तारखेपर्यंत प्रवेशिका दाखल करण्यास मुदतवाढ!

Next Post

पालक व शिक्षण विभागाने सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका ठेवावी – उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

Next Post
Nilam Gorhe

पालक व शिक्षण विभागाने सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका ठेवावी - उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!