Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालय: “दहा वर्षानंतरही सुनावणी नाही, अशा कच्च्या कैद्यांची सुटका हा खरा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव!”

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
farm laws were in coma after sc decision, govt just declared dead

मुक्तपीठ टीम

येत्या १५ ऑगस्ट रोजी आपण ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. संपूर्ण देशात आपला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा केला जाणार आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण मतप्रदर्शन केलं आहे. वर्षानुवर्षे तुरुंगात असलेल्या कैद्यांची सुटका हा भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करण्यासाठी योग्य मार्ग असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारने अशी योजना लवकरात लवकर तयार करावी जेणेकरून विचारधीन आणि किरकोळ गुन्ह्यांतील कैद्यांची सुटका होईल.

न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर न्यायव्यवस्था १० वर्षांत खटल्यांचा निकाल देऊ शकत नसेल, तर कैद्यांची जामिनावर सुटका केली पाहिजे. जर एखादी व्यक्ती १० वर्षांनंतर निर्दोष मुक्त झाली तर त्याला आयुष्यातील ती १० वर्षे परत मिळू शकत नाहीत.

कच्च्या कैद्यांच्या सुटकेनं स्वातंत्र्याचा उत्सव…

  • न्यायमूर्ती कौल यांनी केंद्र सरकारतर्फे उपस्थित अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) केएम नटराज यांना सांगितले की, सरकार स्वातंत्र्याची ७५ वर्षे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणून साजरी करत आहे.
  • शिक्षेचा बराचसा भाग तुरुंगात घालवलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी उपाययोजना करणे हा खर्‍या अर्थाने उत्सवाचा मार्ग असेल.
  • तुरुंग आणि कनिष्ठ न्यायालयांचे ओझे कमी करण्याचा विचार आहे.
  • यासाठी केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करून धोरण तयार करावे.
  • जेणेकरून काही श्रेणीतील विचारधीन आणि दोषींना ठराविक कालावधीनंतर सोडता येईल.

हजारो केदी सुनावणीशिवाय तुरुंगात खितपत

  • देशाच्या उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित अपील आणि जामीन अर्जांचा आढावा घेतल्यानंतर खंडपीठाने ही निरीक्षणे नोंदवली.
  • हजारो आरोपींचे खटले सुनावणी आणि निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
  • गेल्या वर्षी, खंडपीठाने विचारधीन कैद्यांना दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि अपील प्रलंबित कैद्यांना जामीन मंजूर करण्यासाठी स्वतःहून कार्यवाही सुरू केली होती.

तुरुंगात टाका, पण दोषी ठरल्याशिवाय दीर्घकाळ तुरुंगवास नको…

  • ज्याने गुन्हा केला आहे त्याला तुरुंगात टाकू नये, असे आम्ही म्हणत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
  • परंतु खटला दीर्घकाळ चालवणे आणि एखाद्याला दोषी ठरवल्याशिवाय दीर्घकाळ तुरुंगात ठेवणे हा उपाय असू शकत नाही.
  • तसेच, पहिल्यांदाच, किरकोळ गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्यांना चांगल्या वर्तनाच्या अटीवर सोडले जाऊ शकते.

Tags: Azadi Ka Amrit MahotsavIndiaSupreme CourtUndertrial Prisonersकच्चे कैद्दीभारतसर्वोच्च न्यायालयस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
Previous Post

पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी ४ कोटींचा निधी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

Next Post

न्यायालय काय योग्य मानणार, शिवसेनेचं भविष्य कसं ठरवणार? पक्षातून बंडखोरी की पक्षांतर्गत असंतोष?

Next Post
न्यायालय काय योग्य मानणार, शिवसेनेचं भविष्य कसं ठरवणार? पक्षातून बंडखोरी की पक्षांतर्गत असंतोष?

न्यायालय काय योग्य मानणार, शिवसेनेचं भविष्य कसं ठरवणार? पक्षातून बंडखोरी की पक्षांतर्गत असंतोष?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!