Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सुली डिल्सविरोधातील चौकशी थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, एकत्र सुनावणीही अवघडच!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

अनेक मुस्लिम महिलांचे ऑनलाइन ऑक्शन करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या “सुल्ली डील्स” अॅपचा निर्माता ओंकारेश्वर ठाकूर याच्याविरुद्ध नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या चौकशीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.तसेच सुली डील्स अॅपच्या कथित निर्मात्याने एफआयआर एकत्र करण्यासाठी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तीन राज्यांना नोटीस बजावली. दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशला नोटीस जारी करताना, न्यायमूर्ती एस के कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने प्रश्न विचारला की, आरोपीला दिलासा देणे शक्य आहे का? ते ही त्याच्यावर वेगवेगळ्या कृत्यांसाठी वेगवेगळ्या गुन्ह्यांचा आरोप असताना. जाणकारांच्या मते, आरोपीने अपलोड केलेले कन्टेंट हे वेगवेगळ्या महिलांचे असल्याने एकत्र सुनावणी अवघड आहे.

नेमकं प्रकरण काय?

  • जुलै २०२१ मध्ये, दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता की ‘GitHub’ या इंटरनेट प्लॅटफॉर्मवर ‘सुली डील ऑफ द डे’ नावाचा कार्यक्रम तयार करण्यात आला होता, जिथे अनेक मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या संमतीशिवाय घेतले गेले होते. कथितरित्या ऑनलाइन लिलावासाठी अपलोड केले गेले होते.
  • नंतर या वर्षी जानेवारीमध्ये, दिल्ली पोलिसांनी बुल्लीबाई अॅपच्या संदर्भात आणखी एक एफआयआर दाखल केला आणि आरोप केला की अॅपचा मजकूर मुस्लिम महिलांचा अपमान करण्याचा हेतू होता.
  • ओंकारेश्वर ठाकूर नावाच्या व्यक्तीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशकडून उत्तरे मागितली आहेत.
  • ठाकूर यांनी सुली डील्स अॅपशी संबंधित उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात दाखल केलेल्या एफआयआर किंवा या संदर्भात देशात दाखल केलेल्या कोणत्याही तक्रारी रद्द करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती एस. कौल आणि न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश यांनी त्यांच्या तोंडी टिपणीत सांगितले की, अनेक फोटो अपलोड करण्यात आल्याने अनेक गुन्हे करण्यात आले आहेत आणि ज्यांचे फोटो अपलोड करण्यात आले ते सर्व पीडिता आहेत. या एफआयआरच्या संदर्भात सुरू असलेल्या कोणत्याही तपासाला स्थगिती देणार नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे. खंडपीठाने याचिकेवर नोटीस बजावली आणि तीन आठवड्यांनंतर सुनावणी ठेवली.


Tags: Sulli Deals AppSupreme Courtओंकारेश्वर ठाकूरसर्वोच्च न्यायालयसुल्ली डील्स अॅप
Previous Post

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या राउरकेला स्टील प्लांटमध्ये अॅप्रेंटिसशिपच्या २१० जागांवर संधी

Next Post

श्रीमंत मित्रांची लाख कोटींची कर्जे माफ, गरीबांच्या मोफत सुविधांना मात्र विरोध! व्वा रे भाजपाचे अच्छे दिन!!

Next Post
Dhananjay Shinde

श्रीमंत मित्रांची लाख कोटींची कर्जे माफ, गरीबांच्या मोफत सुविधांना मात्र विरोध! व्वा रे भाजपाचे अच्छे दिन!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!