Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लाल मुंगीची चटणी कोरोनावरील औषध? सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

September 10, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
SC

मुक्तपीठ टीम

कोरोना विषाणुच्या उपचारासाठी लाल मुंगीची चटणी वापरण्याचे निर्देश देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. देशभरात कोरोनाच्या उपचारासाठी पारंपारिक औषधं किंवा घरगुती उपचारांना मान्यता देऊ शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी ही याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी स्पष्ट केले की अशी बरीच पारंपारिक औषधं आहेत, सर्वच घरात पारंपारिक औषधोपचार केला जातो. पण या उपचारांचे विपरीत परिणामही भोगावे लागू शकतात, त्यामुळे आम्ही हे पारंपारिक औषध देशभरात लागू करण्यास सांगू शकत नाही.

 

लाल मुंग्यांच्या चटणीला कोरोना उपचारात मान्यतेसाठी याचिका

  • उच्च न्यायालयाने आयुष मंत्रालयाच्या महासंचालकांना आणि सीएसआयआरला कोरोनावर उपचार म्हणून लाल मुंग्याची चटणी वापरण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.
  • ३ महिन्यांच्या आत या प्रस्तावावर निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते.
  • त्यामुळे निर्माण झालेली विचित्र स्थिती संपवायच्या हेतूने ही याचिका फेटाळण्यात आली आहे.
  • संविधानाच्या अनुच्छेद १३६ अंतर्गत विशेष याचिकेवर सुनावणी करू इच्छित नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
  • त्यामुळे याचिका फेटाळण्यात आली.

 

लाल मुंगीची चटणी औषधी गुणांनी परिपूर्ण असल्याचा दावा

  • याचिकेत लाल मुंगीच्या चटणीचे औषधी गुण स्पष्ट करण्यात आले आहेत.
  • लाल मुंग्या आणि हिरव्या मिरच्यांचे मिश्रण करून बनवलेली चटणी ओडिशा आणि छत्तीसगडसह देशातील आदिवासी भागात ताप, खोकला, सर्दी, थकवा, श्वसनाच्या समस्या आणि इतर आजारांवर औषध म्हणून वापरली जाते.
  • लाल मुंग्यांची चटणी औषधी गुणांनी समृद्ध आहे, असा दावा करण्यात आला आहे.
  • त्यात फॉर्मिक ऍसिड, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२ आणि झिंक असते, असे मांडले जाते.
  • कोरोनाच्या उपचारांमध्ये हे किती प्रभावशाली आहे याची चाचणी करणे आवश्यक आहे असे याचिकेत नमुद करण्यात आले आहे.
  • खंडपीठाने ओडिशाच्या आदिवासी समुदायाचे सदस्य नायधर पाढियाल यांना कोरोना विरोधी लस घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Tags: coronaकोरोनालाल मुंगी
Previous Post

तिसऱ्या लाटेबद्दलची भारतातील चिंता अमेरिकेत प्रत्यक्षात! साडेसात लाख लहान मुले कोरोनाग्रस्त!

Next Post

“जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो,” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गणरायाचरणी प्रार्थना

Next Post
Maha CM

"जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो," मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गणरायाचरणी प्रार्थना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!