Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

धनुष्यबाणाची लढाई आता निवडणूक आयोगात! आता काय घडणार?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
uddhav camp vs shinde camp

मुक्तपीठ टीम

दिवसभर चाललेल्या वकिली युक्तिवादानंतर अखेर संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सध्यातरी शिंदे गटाला दिलासा देणारा ठरला आहे. निवडणूक आयोगात आता शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने निवडणूक आयोगासमोरील सुनावणीला स्थगिती दिलेली नाही. आता निवडणूक आयोग त्यावर सुनावणी घेऊन, पुरावे तपासून निर्णय घेण्यास मोकळा आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय घडेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्याचा वेध घेणं आवश्यक आहे.

आज दिवसभरातील सुनावणीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वकील अॅड. अॅड. कपिल सिब्बल, अॅड. अभिषेक मनु सिंघवी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वकिल अॅड. निरज कौल, अॅड. महेश जेठमलानी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यात निवडणूक आयोगाचे वकील अॅड. दातार यांनी आयोगाची बाजू मांडत स्थगिती रोखण्यासाठी प्रयत्न केले, जे पुढे यशस्वी ठरले. देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही यात भाग घेतला.

निवडणूक आयोगात काय घडणार?

  • निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर तेच खरी शिवसेना असल्याचं सांगत दावा केलेला आहे.
  • उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुरावे सादर करत आपलं धनुष्यबाण चिन्ह आपलंच असल्याचा दावा केला जाईल.
  • जर आयोगाला एकाची बाजू योग्य वाटली तर धनुष्यबाण एका गटाला देण्याचा निर्णय होईल.
  • जर दोन्ही गटांच्या वादात द्विधा अवस्था असेल तर आयोग परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवू शकतो. त्या परिस्थितीत दोन्ही गटांना स्वतंत्र वेगळी चिन्ह घ्यावी लागतील.

सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

  • सर्वोच्च न्यायालयात बंडखोरी केलेल्या शिंदे गटाविरोधातील अपात्रतेवरील सुनावणी सुरु राहणार आहे.
  • त्यात सर्वोच्च न्यायालयाच्याच आदेशाने स्थगित झालेली उपाध्यक्षांसमोरील अपात्रततेची कारवाई पुन्हा त्यांच्यासमोरच सुरुवाच करायची का?
  • राज्यपालांनी आपात्रतेची कारवाई सुरु असलेल्या एकनाथ शिंदेंना सत्ता स्थापनेचे निमंत्रण देणे योग्य आहे का?
  • या अशा अन्य प्रश्नांवर तेथे सुनावणी सुरुच राहणार आहे.
  • सर्वोत महत्वाचं म्हणजे पक्षांतरबंदी कायदा, त्यातील तरतुदी हे सारं संविधानाच्या १०व्या परिशिष्टात आहे. त्याचाही उहापोह सुनावणीत होईल, तो दिशादिग्दर्शन करणारा, सर्वात महत्वाचा भाग असेल.

Tags: election commissionShinde CampShivsenaSupreme Courtनिवडणूक आयोगशिंद गटशिवसेनासर्वोच्च न्यायालय
Previous Post

पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी नोंदणी सुरू

Next Post

चला नवरात्रीत कोल्हापूरच्या अंबामातेच्या दर्शनाला…

Next Post
Kolhapur Ambabai temple

चला नवरात्रीत कोल्हापूरच्या अंबामातेच्या दर्शनाला...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!