Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनामुळे निधन झालेल्यांच्या कुटुंबियांच्या सानुग्रह अनुदान दाव्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून ‘ही’ कालमर्यादा निश्चित!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जाहीर केल्याप्रमाणे कोरोना कारणामुळे निधन झालेल्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्यासंबंधीचे दावे दाखल करण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने कालमर्यादा निश्चित केली आहे. २०२१ मध्ये दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका सी क्रमांक ५३९ मधील विविध अर्ज क्रमांक १८०५ विषयी न्यायालयाने २४ मार्च २०२२ रोजी यासंबंधी आदेश दिला आहे.

 

यासंबंधी न्यायालयाकडून जारी करण्यात आलेले प्रमुख निर्देश पुढीलप्रमाणे आहेत –

  • कोरोनामुळे जर कोणाचा २० मार्च २०२२ पूर्व मृत्यू झाला असेल तर त्यासंबंधी नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करण्यासाठी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना दि. २४ मार्च, २०२२ पासून पुढे ६० दिवसांची कालमर्यादा लागू असणार आहे.
  • आगामी काळात कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्या तारखेपासून ९० दिवसांच्या कालावधीमध्ये नुकसान भरपाईचा दावा करता येणार आहे.
  • संबंधितांनी नुकसान भरपाईचा दावा केलेल्या तारखेपासून त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे कार्य तीस दिवसांच्या कालावधीत होवून प्रत्यक्ष नुकसान भरपाईची रक्कम देण्यासंबंधी, यापूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
  • अतिशय अवघड परिस्थितीत, अडचणीच्या काळामुळे जर दावेदार विहीत काळामध्ये नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करू शकला नाही, तर त्या दावेदाराने तक्रार निवारण समितीकडे जावे. दावेदाराला तक्रार निवारण समिती मार्फत दावा दाखल करण्याचा मार्ग खुला आहे. या समितीमार्फत प्रत्येक प्रकरणाच्या कारणांचा विचार केला जाईल. आणि तक्रार निवारण समितीला लक्षात आले की, दावेदाराला निर्धारित वेळेत दावा दाखल करणे शक्य नव्हते, सर्व परिस्थिती दावेदाराच्या नियंत्रणाबाहेरची होती. अशावेळी त्या प्रकरणानुसार त्या दाव्याचा विचार केला जावू शकतो.
  • याशिवाय, बनावट दाव्यांची जोखीम कमी करण्यासाठी दाव्यांपैकी पाच टक्के अर्जांची आगंतुक छाननी पहिल्याच टप्प्यात करण्यात यावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्याचबरोबर जर कोणी खोटा दावा सादर केल्याचे आढळून आले तर डीएम कायदा, २००५ कलम ५२ अन्वये त्याचा विचार केला जाणार असून, संबंधित शिक्षेच्या कारवाईस पात्र ठरणार आहेत.

Tags: coronaSupreme Courtकोरोनाराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणसर्वोच्च न्यायालय
Previous Post

त्राटिकेचं सोंग, परंपरेची २०० वर्ष!

Next Post

देवरावजी दुधलकर…उत्कट समर्पणशीलतेचा सेवादलीय कार्यकर्ता!

Next Post
Devraj ji Dudhalkar

देवरावजी दुधलकर...उत्कट समर्पणशीलतेचा सेवादलीय कार्यकर्ता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!