मुक्तपीठ टीम
भारतीय स्टेट बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स या पदावर सिस्टम ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह, सिनियर एक्झिक्युटिव्ह, सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी एकूण ३५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. ३५ रिक्त पदांपैकी ७ नियमित आणि २९ कंत्राटी श्रेणीतील पदं आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण नवी मुंबई आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवाराची पद क्र.१, २, ३ आणि ४ साठी शैक्षणिक पात्रता १) बीई/ बीटेक (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन्स किंवा एमसीए/ एमटेक/ एमएससी (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक अॅंड कम्युनिकेशन्स) २) ०२ ते १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३२ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
त्याच वेळी, या पदांसाठी घेण्यात येणारी ऑनलाइन लेखी परीक्षा २५ जून रोजी होणार आहे. यासोबतच या परीक्षेचे प्रवेशपत्र १६ जूनपासून डाउनलोडसाठी उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जातील. अशा परिस्थितीत, कार्ड जारी केल्यानंतर, उमेदवार आवश्यक तपशील प्रविष्ट केल्यानंतर त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.
अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.