Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिंदु संघटनांच्या विरोधामुळे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने ‘रविवार’ ऐवजी ‘शुक्रवार’ची घोषित केलेली सुट्टी केली रद्द !

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
हिंदु संघटनांच्या विरोधामुळे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने ‘रविवार’ ऐवजी ‘शुक्रवार’ची घोषित केलेली सुट्टी केली रद्द !

मुक्तपीठ टीम

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या मुंबईतील दादर, गोवंडी येथील शाखांनी १ डिसेंबर २०२२ पासून ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ रविवारऐवजी दर शुक्रवारी बंद राहील, असा निर्णय ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या मुंबईतील काही शाखांनी घेतला होता. या निर्णयाला हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदु संघटना आणि जागृत नागरिकांनी विरोध केला होता. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने गोवंडी शाखा, दादर शाखा आणि नरिमन पॉईंट येथील मुख्य शाखा या ठिकाणी निवेदन देऊन हा निर्णय रहित करण्याची मागणी केली होती. तरी आज ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून हा निर्णय मागे घेतला असल्याचे बँकेने जाहीर केले. धर्मनिरपेक्ष लोकशाहीमध्ये एका समाजाचे लांगुलचालन करण्याचा असा प्रयत्न निषेधार्ह आहे. बँकेने निर्णय मागे घेतला, याचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते. असे अन्य कुठेही लक्षात आल्यास आम्ही त्याला विरोध करू, असेही समितीने म्हटले आहे.

SBI-Tweet regarding holiday change

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या या निर्णयामुळे जनसामान्यांमध्ये बँक मुसलमानधार्जिणे निर्णय घेत असल्याची भावना निर्माण झाली होती. शासन नियंत्रित बँकांमध्ये एका विशिष्ट धर्माला झुकते माप देण्याचा निर्णय घेणे, हे अन्य धर्मीयांवर अन्याय केल्यासारखेच आहे. समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवारी सुटी जाहीर केली जात आहे, यातून आपण पाकिस्तानात रहातो कि हिंदुस्थानात ?’, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ काही शाखांचे सुट्टीचे वारांमध्ये बदल करण्याचे नेमके कारण काय ? असे प्रश्न समितीने बँकेला विचारले होते. हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा समितीने दिला होता. आता बँकेने निर्णय मागे घेतला असला, तरी केंद्र सरकारने या प्रकाराची सखोल चौकशी करून असे निर्णय घेणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.


Tags: dadargovandiHindu Janjagruti SamitiMaharashtramumbaiSBIState Bank of IndiaWeekly OFF
Previous Post

जागतिक एड्स डे : काय आहे हा दिवस साजरा करण्याचा उद्देश? जाणून घ्या…

Next Post

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा – राज्य निवडणूक आयुक्त

Next Post
maharashtra state election commission

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा - राज्य निवडणूक आयुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!