Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चीनची ग्लोबल गोची…आता सौदी अरेबियाने बंद केल्या १८४ चीनी वेबसाइट्स!

March 12, 2021
in घडलं-बिघडलं
0
China

मुक्तपीठ टीम

सौदी अरेबियाने खराब, भेसळयुक्त वस्तू विकणाऱ्या आणि बनावट ऑफर देण्याच्या कारणावरून तब्बल १८४ चीनी वेबसाइट्स बंद केल्या आहेत. एका वृत्त संस्थेच्या अहवालानुसार, या वेबसाइट्स सौदी अरेबियाच्या बाजाराला लक्ष्य करीत होत्या. तसेच दुसऱ्या एका वृत्त संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की, या वेबसाइट्स ग्राहकांना परतावा, एक्सचेंज आणि विक्री सेवा देण्यासही अपयशी ठरल्या आहेत. एवढेच नव्हे तर गुणवत्तेच्या बाबतीत ही खरेदीदारांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आता सौदी अरेबियाच्या मंत्रालयाने या सर्व साइट्सना ब्लॉक केले आहे.

अहवालात असे म्हटले आहे की, या वेबसाइट्सवर ग्राहक सेवेसह स्टोअरचा पत्ता आणि संपर्क क्रमांक लिहिलेले नाहीत. सौदी अरेबिया सरकारने सोशल मीडियाद्वारे फसव्या जाहिरातींपासून सुटका मिळवण्यासाठी सामान्य जनतेला विश्वसनीय स्टोरमधूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

 

सुरुवातीला एक वेबसाइट ब्लॉक करण्यात आली होती. पण त्यावेळी वेगळ्या पाच बनावट वेबसाइटसमोर आल्या ज्यामाध्यमातून वस्तूंची विक्री करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या १८४ वेबसाइट्सना एकाचवेळी जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने लॉन्च करण्यात आल्या होत्या. हेच मुख्य कारण आहे की, या सर्व वेबसाइट्सना ब्लॉक करावे लागले आहे. या वेबसाइटद्वारे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, परफ्यूम, पिशव्या, शूज, कपडे आणि सौंदर्यप्रसाधने विकल्या गेल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे. मंत्रालयाने चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

दरम्यान, सौदी अरेबियानेच नाही तर पाकिस्तानमध्येही चीनला जोरदार धक्का दिला आहे. पाकिस्तान सरकारने चीनी अ‍ॅप टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पेशावर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.


Tags: Chinese websitesSaudi Arabiawebsitesवेबसाइटसौदी अरेबिया
Previous Post

कोरोनाच्या दोन डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर खरंच गरजेचं? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

Next Post

पुण्यात नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई अजित पवारांचे आदेश

Next Post
पुण्यात नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई अजित पवारांचे आदेश

पुण्यात नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई अजित पवारांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!