मुक्तपीठ टीम
युक्रेनसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया आर्थिकदृष्ट्या मागे पडला आहे. पाश्चात देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादल्याने तेल पुरवठ्यातही देश मागे पडला आहे. यामुळेच भारताचा इंधन पुरवठा आता रशियापेक्षा सौदी अरेबियातून जास्त होत आहे. खरंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, मात्र त्यात सातत्याने घट होताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात रशियाने भारताला प्रतिदिन ८५५,९५० बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा केला. परंतु जुलै महिन्याच्या तुलनेत हा आकडा २.४ टक्के कमी आहे. दरम्यान भारताला तेल पुरवण्याच्या बाबतीत सौदी अरेबियाने रशियाला मागे टाकले आहे. म्हणजेच आता सौदी अरेबिया हा भारताचा दुसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला आहे. भारत सर्वात जास्त तेल इराककडून खरेदी करतो.
रशियाकडून तेल खरेदी करण्यात २.४ टक्क्यांनी घट!!
- भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा खरेदीदार आहे.
- सध्या सौदी अरेबियाकडून तेल खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे.
- भारताने ऑगस्टमध्ये सौदी अरेबियाकडून दररोज ८६३,९५० बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे.
- जुलै महिन्यातील खरेदीच्या तुलनेत हा आकडा ४.८ टक्के आहे.
- तर, भारत रशियाकडून खरेदी करत असलेल्या कच्च्या तेलात गेल्या दोन महिन्यांत २.४ टक्क्यांनी घट झाली आहे.
रशियाकडून तेल खरेदीत घट
- २०२२ मध्ये युक्रेनसोबत झालेल्या युद्धामुळे अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी रशियावर विविध आर्थिक निर्बंध लादले आहेत.
- अलीकडच्या काही दिवसांत रशियाकडून तेल खरेदी कमी झाली आहे.
- मात्र गेल्या दशकापासून भारतासाठी मोठ्या तेल निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत रशियाचा समावेश आहे.
- २०१७-१८ पर्यंत, भारत रशियाकडून त्याच्या गरजेच्या १ टक्क्यांहून कमी तेल खरेदी करत असे.
- यानंतर तेल खरेदीचा आकडा १.४ टक्क्यांवर पोहोचला.
- एप्रिल ते जानेवारी २०२१-२२ पर्यंत भारताच्या तेल आयातीत रशियाचा वाटा २.३ टक्के होता.
ओपेक देशांकडून तेल खरेदीत ५९.८ टक्क्यांनी घट…
- कच्च्या तेलाच्या खरेदीत भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार आहे.
- गेल्या १६ वर्षांत भारताने ओपेक देशांसोबत लेथमध्ये लक्षणीय घट केली आहे.
- गेल्या १६ वर्षांत ओपेक देशांकडून तेल खरेदीत ५९.८ टक्क्यांनी घट झाली आहे.
- ओपेक ही १३ पेट्रोलियम निर्यातदारांची संघटना आहे. जे जगातील अनेक देशांना तेलाचा पुरवठा करते.
- एकेकाळी भारताने ओपेक देशांकडूनही बहुतांश तेल खरेदी केले होते, मात्र गेल्या काही वर्षांत हा आकडा सातत्याने घसरत आहे.
भारत तेल कोठून खरेदी करतो:
- २०२०-२१ मध्ये भारताने इराकमधून सर्वाधिक तेल खरेदी केले.
- इराक अजूनही भारताला सर्वात मोठा तेल निर्यात करणारा देश असला तरी तेल खरेदीत घट झाली आहे.
- याशिवाय भारत सौदीकडून आणि नंतर रशियाकडून आवश्यक तेल खरेदी करतो.
- २००९-१० मध्ये भारताने इराककडून ९ टक्के तेल खरेदी केले होते, जे २०२०-२२ मध्ये वाढून २२ टक्के झाले आहे.
याशिवाय भारत अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. - २०२०-२१ मध्ये अमेरिका चौथा सर्वात मोठा निर्यातदार बनला.
- अमेरिका भारताचा तेल आयात करणारा चौथा सर्वात मोठा पुरवठादार आहे.