Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच राहणार

September 16, 2022
in सरकारी बातम्या
0
Vadhu-Tulapur Name will remain same as before

मुक्तपीठ टीम

मौजे वढू-तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्वीप्रमाणेच ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ‘ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अनुमती दिली. वढू-तुळापूर येथील ग्रामस्थांनी  मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समाधीस्थळ विकासाच्या विविध मागण्यांचे त्यांना निवेदन दिले. दरम्यान, जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण वनक्षेत्रात बिबट सफारी प्रकल्प तयार करण्यात येणार असून याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.            

शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. अनुपकुमार यादव, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, सांस्कृतिक कार्य विभागाचे  सचिव सौरभ विजय,सचिव (सुधारणा) शैला ए. यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.            

यावेळी वढू-तुळापूर येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन या समाधीस्थळाचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ करण्याची मागणी मान्य केली.

आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्प            

जुन्नर तालुक्यात आंबेगव्हाण हे स्थळ बिबट सफारीसाठी अनुकूल असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा सविस्तर आराखडा तयार करावा असे निर्देश देतानाच सुमारे साडेसहाशे हेक्टर क्षेत्रापैकी शंभर ते दीडशे हेक्टर क्षेत्रावर आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्प साकारणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.            

राजगुरुनगर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे काम ज्या जागेवर भूमिपूजन झाले आहे, त्याच ठिकाणी हे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. खानापूर येथील कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रक्रिया उद्योग कार्यान्वित  करण्यासाठी विशेष योजना तयार केल्यास हजारो कुटुंबियांना रोजगार मिळेल, असे सांगून हिरडा या औषधी वनस्पतीचे उत्पादन करणाऱ्या श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा सहकारी उत्पादक संस्थेचे थकीत कर्ज भरण्यासाठी २ कोटी रुपये एवढी रक्कम विशेष बाब म्हणून देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव आणण्याचे निर्देश यावेळी दिले.            

जुन्नर तालुक्यातील पूर येथील श्री क्षेत्र कुकडेश्वर मंदीराच्या संरचनेचे परीक्षण करण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.


Tags: Chhatrapati Sabhaji Maharaj Sacrifice placeMaharashtravadhu Tulapurछत्रपती संभाजी महाराज बलिदानस्थळमहाराष्ट्रवढू-तुळापूर
Previous Post

वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जीएसटी चुकवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल

Next Post

भारताचा इंधन पुरवठा आता रशियापेक्षा सौदी अरेबियातून जास्त! इराक नं. १च!!

Next Post
saudi arebia oil refinery

भारताचा इंधन पुरवठा आता रशियापेक्षा सौदी अरेबियातून जास्त! इराक नं. १च!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!