Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यपाल सत्यपाल मलिकांचा हल्लाबोल: “शेतकऱ्यांना एमएसपी नाही, कारण मोदींचे मित्र अदानी!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Satyapal Malik on Pm Modi Friend Adani

मुक्तपीठ टीम

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, की तुम्ही देशातील शेतकऱ्यांना पराभूत करू शकत नाही आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा लढा सुरुच राहिल. मलिक यांनी एमएसपी लागू न होण्यामागचे कारण पंतप्रधानांचे मित्र अदानी असल्याचे सांगितले आहे. जो पाच वर्षात आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.

देशातील शेतकऱ्यांना पराभूत करू शकत नाही: सत्यपाल मलिक

  • हरियाणातील नूहच्या किरा गावात एका कार्यक्रमात किमान आधारभूत किंमत (एमएसपी) लागू करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीचे समर्थन करताना मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
  • एमएसपी लागू होईपर्यंत, कायदेशीर दर्जा मिळत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत.
  • जर आता एमएसपी लागू केली नाही, तर पुन्हा लढा होईल, जोरदार लढाई होईल.
  • तुम्ही देशातील शेतकऱ्यांना पराभूत करू शकत नाही.
  • त्यांच्याकडे ईडी आणि इन्कम टॅक्सचे लोक पाठवू शकत नाही, मग त्यांना घाबरवणार कसे?
  • शेतकरी एमएसपी घेऊन राहिल.

देश विकण्याची तयारी!!

  • मला मेघालयाहून येण्यासाठी गुवाहाटी विमानतळावर यावे लागते.
  • मला तिथे एक मुलगी दिसली.
  • तिच्या हातात पुष्पगुच्छ होता.
  • मी तिला विचारले, तेव्हा तिने सांगितले की ती अदानींच्या कडून आली आहे.
  • तिने सांगितले की हे विमानतळ अदानी यांना देण्यात आले आहे.
  • अदानींना विमानतळ, बंदरे, मोठमोठ्या योजना दिल्या आहेत…एकप्रकारे देश विकण्याची तयारी आहे, पण आम्ही तसे होऊ देणार नाही.

शेतकरी देशोधडीला लागतो…

  • अदानी यांनी पानिपतमध्ये गव्हाचे एक मोठे गोदाम बांधले आहे, जे स्वस्तात घेतलेल्या गव्हाने भरले आहे.
  • महागाई वाढली की तो गहू बाहेर काढला जाईल.
  • म्हणजे हे पंतप्रधानांचे मित्र नफा कमावतात आणि शेतकरी देशोधडीला लागतो.
  • ही बाब खपवून घेतली जाणार नाही, याविरोधात लढा दिला जाईल

Tags: FarmerMSPPM Narendra modiSatyapal Malikएमएसपीपंतप्रधान नरेंद्र मोदीशेतकरीसत्यपाल मलिक
Previous Post

#महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन: विधानपरिषद २३ ऑगस्ट २०२२

Next Post

राज्यातील ३ हजार ९४३ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली आदेश जारी

Next Post
Girish Mahajan

राज्यातील ३ हजार ९४३ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!