मुक्तपीठ टीम
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, की तुम्ही देशातील शेतकऱ्यांना पराभूत करू शकत नाही आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा लढा सुरुच राहिल. मलिक यांनी एमएसपी लागू न होण्यामागचे कारण पंतप्रधानांचे मित्र अदानी असल्याचे सांगितले आहे. जो पाच वर्षात आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.
देशातील शेतकऱ्यांना पराभूत करू शकत नाही: सत्यपाल मलिक
- हरियाणातील नूहच्या किरा गावात एका कार्यक्रमात किमान आधारभूत किंमत (एमएसपी) लागू करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीचे समर्थन करताना मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
- एमएसपी लागू होईपर्यंत, कायदेशीर दर्जा मिळत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत.
- जर आता एमएसपी लागू केली नाही, तर पुन्हा लढा होईल, जोरदार लढाई होईल.
- तुम्ही देशातील शेतकऱ्यांना पराभूत करू शकत नाही.
- त्यांच्याकडे ईडी आणि इन्कम टॅक्सचे लोक पाठवू शकत नाही, मग त्यांना घाबरवणार कसे?
- शेतकरी एमएसपी घेऊन राहिल.
देश विकण्याची तयारी!!
- मला मेघालयाहून येण्यासाठी गुवाहाटी विमानतळावर यावे लागते.
- मला तिथे एक मुलगी दिसली.
- तिच्या हातात पुष्पगुच्छ होता.
- मी तिला विचारले, तेव्हा तिने सांगितले की ती अदानींच्या कडून आली आहे.
- तिने सांगितले की हे विमानतळ अदानी यांना देण्यात आले आहे.
- अदानींना विमानतळ, बंदरे, मोठमोठ्या योजना दिल्या आहेत…एकप्रकारे देश विकण्याची तयारी आहे, पण आम्ही तसे होऊ देणार नाही.
शेतकरी देशोधडीला लागतो…
- अदानी यांनी पानिपतमध्ये गव्हाचे एक मोठे गोदाम बांधले आहे, जे स्वस्तात घेतलेल्या गव्हाने भरले आहे.
- महागाई वाढली की तो गहू बाहेर काढला जाईल.
- म्हणजे हे पंतप्रधानांचे मित्र नफा कमावतात आणि शेतकरी देशोधडीला लागतो.
- ही बाब खपवून घेतली जाणार नाही, याविरोधात लढा दिला जाईल