Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

युवक काँग्रेसचा २५ हजार रक्तपिशव्यांचा निर्धार : सत्यजित तांबे

April 8, 2021
in घडलं-बिघडलं
0
satyajeet thambe

मुक्तपीठ टीम

 

राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत असताना रक्ताचा तुडवडाही मोठ्या प्रमाणात भासत आहे. राज्यासमोरचे रक्ताचे संकट लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करुन २५ हजार पिशव्या रक्तसंकलन करण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

 

यासंदर्भात बोलताना तांबे म्हणाले की, कोणतीही नैसर्गिक आपत्ती वा संकटकाळात युवक काँग्रेस नेहमीच जनतेच्या सेवेसाठी उभी राहिली आहे. राज्याला सध्या रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज असल्याने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तसंकलन केले जाणार आहे. मागील वर्षीदेखील राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवला असताना महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या पुढाकाराने राज्यभरात रक्तदान शिबिरे घेऊन २८५०० रक्तपिशव्यांचे संकलन केले होते.

 

या वर्षी देखील मागील वर्षीप्रमाणे रक्तदान शिबिरे घेतली जाणार असून किमान २५ हजार रक्तपिशव्यांचे लक्ष्य ठेवलेले आहे. सरकारने घालून दिलेल्या कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुनच ही रक्तदान शिबीरे घेतली जातील, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.

 

लॉकडाऊनच्या काळात युवक काँग्रेसने चालवलेल्या मदतकार्यात पन्नास लाखांपेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष अन्नधान्य व जेवणाचे वाटप, लाखो लोकांना मास्क आणि आर्सेनिक एल्बम ३० या औषधांचे वाटप, कोरोना योध्यांचा सत्कार असे अनेक उपक्रम राबवले होते. यावर्षीदेखील युवक काँग्रेस गरज पडेल तशी सर्व प्रकारची मदत महाराष्ट्रभर करेल, असा विश्वास सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.

 


Tags: Congressयुवक काँग्रेसयुवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे
Previous Post

“कोरोना संकटातही गलिच्छ राजकारण, केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी!” : नाना पटोले

Next Post

महाराष्ट्राला गरजेनुसार लसींचा पुरवठा व्हावा, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मागणी

Next Post
rajesh tope

महाराष्ट्राला गरजेनुसार लसींचा पुरवठा व्हावा, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!