Tuesday, June 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेवटच्या क्षणी रुग्णांना सरकारी रुग्णालयात पाठवण्याची खासगी लबाडी!

गृहराज्यमंत्री सतेज पाटलांचा खासगी रुग्णालयांवर कारवाईचा इशारा

May 23, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
satej patil

मुक्तपीठ टीम

देशात कोरोना संसर्गानं त्रासलेल्या रुग्णांचा गैरफायदा घेणाऱ्या खासगी रुग्णालयांविरोधात रोजच नव्या तक्रारी समोर येत आहेत. नवा गैरप्रकार आपली मृत्यूसंख्या कमी दिसावी, यासाठी लढवलेल्या शक्कलीचा आहे. खासगी रुग्णालयांमध्ये चालणाऱ्या अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता पालकमंत्री सतेज पाटीलांनी आक्रमक झाले आहेत. कोरोना बाधितांवर आठ दिवस खासगी रुग्णालयात उपचार करूनही जर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसेल तर शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना सरकारी रुग्णालयात पाठवण्याच्या गैरप्रकारांवर त्यांनी कडक भूमिका घेतली आहे. जर यापुढे खासगी रुग्णालयातील रुग्ण ४८ तासात सरकारी रुग्णालयात दाखल केले तर अशा खासगी रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

नेमकं काय घडतंय – काय बिघडतंय कोल्हापुरात?

  • कोल्हापूर जिल्ह्यात गेले महिनाभर करोनाचा संसर्ग वाढला आहे.
  • काही वेळा सरकारी रूग्णालयात उपचारासाठी बेड उपलब्ध नसतात.
  • अशावेळी अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात असतात.
  • या रुग्णांना लक्षणे असल्यास त्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना खासगी रुग्णालयाने द्याव्यात, असे आदेश यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
  • मात्र, तरीदेखील काही खासगी रुग्णालये या सूचनांचे पालन करत नाहीत.
  • किरकोळ उपचार करत वेळ घालवतात.
  • रूग्णाचा आजार वाढल्यानंतर शेवटच्या क्षणी त्याला सरकारी रूग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या जातात.
  • त्यामुळे त्यांचे जे काही होईल त्याची जबाबदारी सरकारी रुग्णालयांवर येते, खासगी रुग्णालयं नामनिराळे राहतात.

कोल्हापूर जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. हे मृत्यू लपविण्यासाठी खासगी रूग्णालये शेवटच्या क्षणी सरकारी रुग्णालयात रुग्णाला पाठवत आहेत. त्यामुळे काही रुग्ण दगावत असल्याचे समोर येत आहे. आपल्या रुग्णालयातील मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी ही रुग्णालये रूग्णाच्या जीवाशी खेळत आहेत. त्यामुळे अशा खासगी रुग्णालयांना आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. शेवटच्या वेळी रुग्णाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना देणाऱ्या खासगी रुग्णालयांवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे. त्यामुळे आता थेट जिल्हा प्रशासन त्यांना थेट नोटीस काढून कारवाई करणार असल्याचा इशारा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे.


Tags: coronaKolhapurprivate hospitalsatej patilकोरोनाकोल्हापुरखासगी रुग्णालयसतेज पाटील
Previous Post

जालन्याच्या नऊ मजुरांना २ वर्षे सोलापुरात वेठबिगारासारखं डांबलं!

Next Post

सीबीएसई बारावी परीक्षेचा अंतिम निर्णय १ जूनला होण्याची शक्यता, केंद्राने सर्व राज्यांकडून मागितले लेखी उत्तर

Next Post
cbse

सीबीएसई बारावी परीक्षेचा अंतिम निर्णय १ जूनला होण्याची शक्यता, केंद्राने सर्व राज्यांकडून मागितले लेखी उत्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!