मुक्तपीठ टीम
आज मुली उच्च शिक्षण घेत, उत्तुंग शिखर गाठत देशासह गावाचे नाव उंचावत आहेत. जावळी तालुक्यातील गांजे गावामधील रहिवासी असेलेल्या शिल्पा चिकणे या मुलीची असामान्य कामगिरी अनेक मुलींसाठी प्रेरणा ठरणार आहे. शिल्पा चिकणेंची सैन्यदलात निवड झाली आहे. त्या त्यांच्या गावच्या पहिला महिला आहेत ज्यांनी सैन्यदलात प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. गावी येताच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत
- शिल्पा चिकणे या नुकत्याच आसाम रायफलचे प्रशिक्षण घेऊन गावी परतल्या आहेत.
- शिल्पा या आपल्या मूळ गावी येताच प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.
- शिल्पा यांचे गावात आगमन होताच त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
- ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघाली. देशभक्तीपर गीते लावून आणि शिल्पा यांच्यावर हार, पुष्पांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत करण्यात आले.
- यावेळी गावातील महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
- महिलांनी मिरवणुकीच्या वेळी आपल्या दारांपुढे सुंदर अशा रागोळ्या देखील काढल्या होत्या.
शिल्पा यांच्याकडून इतर मुली प्रेरणा घेतील
- शिल्पा चिकणे यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली ही गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
- भारतीय सैन्य दलात भरती होणारी शिल्पा ही गावातील पहिलीच मुलगी आहे.
- त्यांची सैन्यदलात निवड झाल्याने गावाची मान उंचावली. आता गावातील इतर मुली देखील शिल्पा यांच्याकडून प्रेरणा घेतील, भविष्यात गावातील आणखी काही लेकी सैन्य दलात दिसतील अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली.