मुक्तपीठ टीम
प्रशिक्षण देत त्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत ‘सार्थक एज्युकेशनल ट्रस्ट’ने हायब्रीड मॉडेल विकसित केले आहे. जिथे प्रशिक्षणाच्या पारंपरिक पद्धतींसह डिजिटलचाही वापर केला जाईल. याची माहिती अंधेरी येथे नव्याने सुरुवात झालेल्या सार्थक केंद्राच्या उदघाटन प्रसंगी देण्यात आली. ३ जून रोजी दुपारी याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी केंद्राच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले. ”माझे वडील खरंच सुपरहिरो आहे ज्यांनी माझ्या स्वप्नांना पाठिंबा दिला. रोजगार उपलब्ध झाल्याने मी स्वतः घराला सांभाळत असल्याचा मला आनंद आहे.” असे ‘बँक ऑफ अमेरिका’मध्ये कार्यरत संजना म्हणाली. विक्रोळी स्थित संजना हि एका बेस्ट कर्मचाऱ्याची मुलगी आहे. तिच्या सारख्या हजारो दिव्यांगांना सार्थकच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे.
मार्च २०२३पर्यंत १० हजार दिव्यांगांचा कौशल्य विकास करण्याचा मानस असल्याची भावना ‘सार्थक एज्युकेशनल ट्रस्ट’चे संस्थापक डॉ. जितेंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केल्या. ”महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील दिव्यांगांची जीवनशैली बदलत त्यांना स्वावलंबी बनवण्याचे आमचे ध्येय आहे. २०४७ साली आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा शतकोत्सव साजरा करताना आम्ही सर्वसमावेश भारत पाहतो. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरु असून डिजीट्लसह पारंपरिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला दिव्यांगांना सक्षम बनवायचे आहे.” असेही ते पुढे म्हणाले. दिव्यांगांचे लवकर निदान, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती करत त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने सार्थक विविध उपक्रम राबवत असते. २००८साली सुरु झालेल्या सार्थकने आतापर्यंत महाराष्ट्रातील ४ हजारहून अधिक दिव्यांगांना मुंबई, ठाणे, विरार केंद्राद्वारे प्रशिक्षण देत ई-कॉमर्स, तंत्रज्ञान, कन्झ्युमर / रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी अशा विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
”दिव्यांगांना प्रशिक्षणासह रोजगार उपलब्ध होणे फार महत्वाची बाब आहे. मी स्वतः मार्क्स अँड स्पेन्सरमध्ये कस्टमर सेल्स असोसिएट म्हणून काम करत आहे. रोजगाराच्या माध्यमातून मला सार्थकने स्वावलंबी बनवले.” अशा भावना सार्थकच्या माजी विद्यार्थी रुबिना शेख यांनी व्यक्त केल्या.
सार्थकचे देशभरात सक्रियपणे २३ केंद्र कार्यरत आहेत. देशभरातील ३४,३०० हून अधिक दिव्यांगांना प्रशिक्षण दिले असून २३,४५० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांचे २ हजारहून अधिक कॉर्पोरेट पार्टनर आहेत.
२०२१साली सार्थकने दिव्यांगांना रोजगारासाठी व्यासपीठ म्हणून रोजगारसारथी www.rozgarsarathi.org या जॉब पोर्टलची सुरुवात केली. जिथे ४६० + जॉब पुरविणाऱ्या कंपन्यांनी नोंद केली आहे. सार्थकच्या मुंबई येथील केंद्राला महिंद्रा फायनान्स, वोल्टास, ब्रुकफिल्ड प्रॉपर्टी आणि अंबिट ओडीटी फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे.
अधिक माहितीसाठी – contact@sarthakindia.org 011-42004238