Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

नाना पटोले म्हणतात नाणार होणार…कोकणच नानांना ना ना म्हणणार!!

May 24, 2021
in featured, सरळस्पष्ट
0
nana patole

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. आक्रमक नेता. काही दिवसांपूर्वी नाना पटोलेंच्या एका वक्तव्याबद्दल एका भाजपा नेत्याला प्रश्न विचारण्यात आला, त्यांनी उत्तर दिले…कोण विचारतो त्यांना! नाना पटोले भाजपात गेले होते. पण त्यांचं मन काही रमलं नाही. इतरांचे भाजपातील इनकमिंग सुरु असतानाच त्यांनी परतीची वाट धरली. तीही थेट खासदारकीचा राजीनामा देत. आताही विधानसभा अध्यक्षासारखं महत्वाचं सत्तापद सोडून त्यांनी काँग्रेससारख्या राज्यातील नंबर चारवर असणाऱ्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारून पुन्हा नवं आव्हान स्वीकारलं. त्यांच्या बेधडक आक्रमकतेने एक आदर वाटतो. पण कधी कधी भल्याभल्यांची मती गुंग होते आणि ते भलतीच भूमिका घेऊन मोकळे होतात. तसंच कोकणाचील नाणार प्रकल्पाच्या बाबतीत नाना पटोलेंचे झाल्याचे दिसत आहे.

 

नाना पटोले टीव्ही कॅमेऱ्यांसमोर बोलले, नाणार होणार…नानाच नाणारला न्याय देऊ शकेल! राजापूरातील तुळसुंदे गावात नाना पटोले गेले होते. तेथे त्यांनी हे वक्तव्य केले आहे. “नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे आता लोकांचेही मत झालेले आहे. यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न केले जातील. मच्छिमारांचे काही प्रश्न आहेत, त्यांच्याशी बोलू. गुजरातच्या काहींनी इथे जमिनी घेतल्या, त्यावरही निर्णय झाला पाहिजे. नाणार होणार…नानाच नाणारला न्याय देऊ शकेल!”

 

त्यांच्या या वक्तव्यानंतर कोकणात खळबळ उडाली. आघाडी सरकारचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे आहेत, ती शिवसेना आजवर कडवटपणे स्थानिकांची बाजू घेऊन नाणार रिफायणरीच्याविरोधात उभी ठाकलेली. मध्यंतरी शिवसेनेच्या आमदार राजन साळवींनी वेगळा सूर आळवताच त्यांना समजही देण्यात आल्याचे कळते. अशावेळी आघाडीतीलच काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते थेट नाणार प्रकल्पाच्याबाजूने बोलत असतील तर काय समजायचं, असा संभ्रम आणि संशयही स्थानिकांच्या मनात निर्माण झाला.

 

कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष संघटनेचे अशोक वालम यांनी संतापाने म्हटले की, “हेच का ते नाना पटोले असा आम्हाला प्रश्न पडला आहे. आम्ही त्यांना जाऊन भेटलो होतो. विधानसभेचे अध्य़क्ष म्हणून त्यांनी त्यांच्या दालनात बैठक लावली. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांनी चौकशीचे आदेश दिले. एकाही दलालाला सोडणार नाही, असे सांगितले. आणि आता तेच नाना असे कसे बदलले? त्याच दलालांनी तयार केलेले भ्रामक वातावरण त्यांना लोकमत कसे वाटले? नाना नाणार होणार बोलले तरी आम्ही काही ते होऊ देणार नाही म्हणजे नाही. त्यांनी जे करायचे ते करावे. कोकणी माणूस असा दबणार नाही. ऐकणार नाही”.

 

जन हक्क सेवा समितीचे अध्यक्ष सत्यजीत चव्हाण यांच्याशी बोलणे झाले. ते जैतापुर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी समितीचेही नेतृत्व करतात. ते तिडीकीने बोलत होते. ते म्हणाले, “आम्ही जैतापूर असो नाणार एकच अनुभव घेतो. वेगवेगळ्या पेशातील जे जनतेचे शोषण करणारे लुटारू आहेत, ज्यांनी खोटी कागदपत्रे बनवून गरिबांना पैशांची आमिश दाखवून जनतेची लुटालूट केली, तेच पुन्हा रिफायनरीसाठी प्रयत्न करतात. रिफायनरी गेली आता कुणाला लूटायचं, असा प्रश्न या दलालांना पडला आहे आणि म्हणूनच त्यांचा हा खटाटोप चालला आहे. तेच दलाल कधी नेते बनूनही मोठ्या नेत्यांना भेटतात आणि त्यांचा गैरसमज करून देतात. लोकांचे मत बदलले आहे, असे सांगतात. त्यांची दिशाभूल करतात. त्यामुळे नेत्यांनी सावध राहावे”.

नाना पटोले यांनी नाणार होणार म्हणण्यापूर्वी अशोक वालम, सत्यजीत चव्हाणांसारख्यांचे ऐकले पाहिजे होते. नाना पटोले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना एक विनंती. त्यांनी थेट भूमिका मांडण्यापूर्वी गंभीरतेने विचार करावा. त्याही आधी माहिती घ्यावी. लोकांची मतं म्हणून मधले काही बाद झालेले नेते काही सांगतील थेट लोकांचे मन समजून घ्यावे. नाहीतर लोकांचे मन एकाबाजूला आणि लोकांच्या मताच्या नावाखाली मन दुखावणारे भलतेच काही घडत राहील. काळजी घ्यावी.

 

“कोकणातील लोकांची रडगाणीच चिकार. त्यांना सोयी सुविधा पाहिजेच, पण विकासासाठी आवश्यक प्रकल्प नको”, अशी टीका नेहमीच काही करतात. त्यांना मग कोकण तर कळलाच नाही, पण विकासही उमगलेला नाही, असे म्हणावे लागते. मी कोकणातील नाही. पण महाराष्ट्रात फिरलो तसा कोकणातही खूप फिरलो आहे. फरक एवढाच की नेत्यांपेक्षा सामान्यांना जास्त भेटलो. तेही थेट. काय म्हणतात ते?

 

कोकणी माणूस जास्त काही मागतच नाही. तो म्हणतो, “आम्हाला विकास नक्कीच हवा. पण विकास म्हणजे निसर्ग सौंद्य भकास करणारा आणि निसर्गानं दिलेलं वैभव काळवंडवणारा रासायनिक उद्योगांचा मारा नसावा. तो निसर्गाला जपणारा खराखुरा विकास असावा.”

 

काय चुकीचे बोलतात ते? माझ्यामतेही निसर्गाचं वरदान हेच कोकणाचे भांडवल आहे, लक्षात घेऊनच पर्यावरणपूर्क विकासाचं धोरण कोकणासाठी आखलंच पाहिजे. विकास म्हणजे रसायनं सोडून पाणी नासवणारे आणि धूर ओकून हिरवाईला काळवंडणारे उद्योगच नसतात. गैरसमज आहे तो. त्यामुळे ते टाळतही बरंच काही होऊ शकेल. फक्त तळकोकणच नाही तर रायगड, ठाणे आणि पालघरचे आपण लचके तोडलेत. आता बसं झालं.

विकास काय असतो ते समजून घ्या!

• चांगले रस्ते, जलमार्गाने भूतकाळात होणारी वाहतूक आधुनिक स्वरुपात सुरु करा.
• चांगल्या शैक्षणिक, आरोग्य सुविधा, वीज आणि आजच्या काळातील पाण्यासारखीच जीवनावश्यक अशी अखंड इंटरनेट कनेक्टीव्हिटी द्या.
• कोकणात उद्योग आणायचे तर ते पर्यावरणपुरक असावेत.
• आधुनिक उद्योगच पाहिजे असतील तर अखंड वीजपुरवठा आणि इंटरनेट कनेक्टिव्हीटी द्या. त्यातून आयटी उद्योग आणा. इतक्या सुंदर ठिकाणी कोणता आयटी व्यावसायिक आवश्यक सोयी असतील तर येणार नाही?
• यामुळे कोकणाचं खरं वैभव म्हणजे सुंदर किनारे, हिरवेगार डोंगर, खाड्यांचे बॅकवॉटर जसे आहे तसे राहू शकेल. त्यांचा नाश होणार नाही.
• कोकणी वैभव म्हणजे आंबा, काजू, मासे, खेकडे, नारळ यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग जरूर आणावेत.
• तसेच केरळच्या देवभूमीला स्पर्धा करतील किंवा त्यापेक्षाही सरस बॅकवॉटर आणि खाद्यसंस्कृतीचे आंतरराष्ट्रीय मार्केटिंग करून पर्यटनालाच प्रमुख उद्योग बनवा. कोकणाचा नाश करणारे प्रकल्प मुळीच नसावेत.
• लक्षात घ्या, कोकणात रासायनिक उद्योग आणण्यालाच विकास म्हणणारे कोकणातील विमानतळ मान्यतेसाठी मात्र काहीच करत नाहीत.

 

नाना पटोले यांना विनंती आहे. त्यांनी हे सारं समजून घ्यावं. ज्यांना स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेससाठी हजार मतेही मिळवता आली नाहीत ते काय तुम्हाला लोकमत सांगणार! त्यासाठी लोकांशीच बोला. कोकणी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेणाऱ्यांविषयी नाना बोलले. चांगलं आहे. एक करा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेसचेच आहेत. एखादी कायद्यातील तरतूद शोधा. प्रकल्पाची घोषणा होण्यापूर्वी पाच वर्षात स्थानिक शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनी घेतल्या गेल्यात ते व्यवहार रद्द करता येतात का ते पाहा. पण कारवाई केवळ गुजराती उपऱ्यांवर नको, स्थानिक दलालांवरही करा. प्रकल्प समर्थकांचे जमीन व्यवहारही तपासा. असं होऊ नये की केवळ आवाज करायचा आणि प्रकरण सोडून द्यायचे. आधीच वालम सांगतात तसं विधानसभा अध्यक्ष नाना आणि काँग्रेसचे अध्यक्ष नाना यांच्यात पदाबरोबरच भूमिका बदलही झाला आहे. कृपया नाना विदर्भ आठवा. निसर्गसंपन्न चंद्रपूरची कशी खाण उद्योगानं, औष्णिक प्रकल्पानी राख केली आहे, ते मी सांगायला नको. जिथं रखरखाट तिथं असे उद्योग ठिक. तिथं काहीच नाही तर अशा उद्योगांमुळे विकास होईल. पण जिथं निसर्गानं आयतं भांडवलं पुरवलं तिथं का ते नासवता?

 

अशानं कोकणच तुम्हाला ना ना म्हणेल. तुम्ही भले मग होणार होणार कितीही बोला!

 

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठचे संपादक आहेत.)
संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite


Tags: BJPCongressKonkannana patoleकोकण रिफायनरी प्रकल्पनाना पटोलेसत्यजीत चव्हाण
Previous Post

मराठा आरक्षणासाठी संभाजी छत्रपतींची मोहीम, समाजाच्या भावना समजून घेणार

Next Post

#मुक्तपीठ सोमवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ सोमवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!