संतोष शिंदे / व्हा अभिव्यक्त!
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील सर्वोच्च अस्मिता आहे. अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांच्या रक्ताच्या, घामाच्या स्वकर्तुत्वाच्या जीवावर ‘शिवराज्य’ अर्थात रयतेचे राज्य निर्माण झाले. शिवरायांचा राज्यकारभार, त्यांचं कार्य-कर्तुत्व, रयतेशी असलेलं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आदर्शवत आहे. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचेसुद्धा संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. शत्रूसुद्धा छत्रपतींना थराथरा कापत होता. छत्रपती संभाजी महाराज सुद्धा आठ भाषा पारंगत विद्वान होते. संस्कृत भाषा पारंगत व उत्तम साहित्यिक होते. संभाजी महाराजांनी नखशिख, सातसतक, नाइकाभेद व बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. त्यांना उत्तम इंग्रजी भाषा येत होती. ‘चारित्र्यसंपन्न, न्यायनीती धुरंदर, लढवय्ये आणि कुटुंब वत्सल राजा म्हणून संभाजी महाराजांची ओळख होती. शंभूराजे दीडशे लढाया लढले, त्यात एकही लढाई हरले नाहीत, हा इतिहास आहे.
छत्रपतींच्या विरोधात कोणीही वाईट बोलू शकत नव्हता. परंतु काही अनाजी पंतांना छत्रपती शिवाजी महाराजांचा मनातून द्वेष होताच. स्वकीय म्हणून जवळ राहून त्रास देण्याचे काम या काही मंडळींनी केलेले आहेच. छत्रपतींना ते हरवू शकले नाहीत म्हणून या नराधमांनी त्यांचे चरित्र व चारित्र्य, कर्तुत्व चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न केला. साहित्य, पुस्तक, कथा-कादंबऱ्या यामधून वेळोवेळी एकेरी बोलून, एकेरी वाक्य लिहून शिवाजी महाराजांविषयी आकस व्यक्त केला. काही वेळा बदनामीसुद्धा करण्यात आली, ही त्यांची सनातनी सायकोलॉजी आहे. आजपर्यंत जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी ही अशा सनातनी लोकांनीच केलेली आहे. चिकित्सक पध्दतीने बारकाईने इतिहासाचा अभ्यास करताना विसरून चालणार नाही.
राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर अतिशय संतापजनक बदनामी अमेरिकी लेखक जेम्स लेन याने शिवाजीःहिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आजपर्यंत इतकी भयानक बदनामी कोणीही केली नव्हती. परंतु त्यांना मदत करणारी मंडळी की आपल्याच महाराष्ट्रातील अर्थात पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रातीलच होती. जेम्स लेन यांनी आभार मानलेले हे सर्व १२ लोक अपघाताने ब्राह्मण होते, असे म्हणता येणार नाही. हा जातीवाद नसून सत्य परिस्थिती आहे. प्रत्येक महापुरुषाचा इतिहास बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीने चुकीची माहिती पेरण्याचा (प्लांट करण्याचा) वेळोवेळी जाणीवपूर्वक प्रयत्न होतो. संभाजी ब्रिगेडला २००४ साली जेम्स लेन प्रकरणातील हरामखोरी लक्षात आली म्हणून भांडारकर संस्थेविरोधात आंदोलन करून सनातनी, संघी लोकांना इशारा देण्यात आला. परंतु त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने २००४ त्यांची बुडणारी सत्ता जेम्स लेन प्रकरणाचे भांडवल करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली. लोकांचा बुद्धिभेद केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी खोटी आपुलकी दाखवून त्यावेळेस महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्ताधार्यांनी डाव साधला. परंतु तथाकथित बदनामी करणाऱ्या इतिहासकारांना धडा शिकवूनसुद्धा महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या ‘छत्रपतीं’ विषयी आताही वाईट लिहिण्यात आलं हे दुर्दैव आहे. ज्यांची राजकारणाची दुकानेच शिवछत्रपतींचे नाव घेत चालली, तेच आज सत्तेत आहेत, पण तिघांपैकी कुणीही या पुस्तकावर बंदी घा लण्यासाठीपुढाकार घेत नाही, हे दुर्दैव आहे.
गिरीश कुबेर “Renaissance State : The Unwritten story of the Making of Maharastra” या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या आईचा खून केला, म्हणून लिहितात. तेच शाहू महाराज दूरदृष्टीचा अभाव असणारे व कर्तुत्व नसणारे छत्रपती म्हणतात. तर महादजी शिंदे हे विश्वासघातकी होते…’ असेही लिहितात. त्यांनी अशा पद्धतीने वादग्रस्त लिखाण जाणीवपूर्वक केलेले आहे. जेम्स लेनचा बाप म्हणून गिरीश कुबेर यांच्या लेखनाकडे पाहिले जात आहे. कारण खोडसाळपणातून यातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्य, कर्तुत्व बद्दल शंका उपस्थित करून त्यांना कुटुंब व्देष्टी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. असे असताना सुद्धा शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, अशोक चव्हाण, अजीत पवार, बाळासाहेब थोरात, नारायण राणे, चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी आदी मंडळी मूग गिळून गप्प आहेत. हीच मंडळी ब. म. पुरंदरे यांच्या वादग्रस्त लिखाणाच्या सुद्धा अशीच गप्प होती. गिरीश कुबेर जर महाराष्ट्राच्या अस्मितेशी, इतिहासाशी चुकीच्या पद्धतीने छेडछाड करणार असेल खरे महाराष्ट्रद्रोही कोण? उत्तर आहे गिरीश कुबेर व त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साथ देणारे सर्वच!
महाराष्ट्राच्या सत्तेत असणारे खरे महाराष्ट्रद्रोही गिरीश कुबेर यांना छुपा पाठिंबा देत आहेत. सगळे नेते सोयीने भूमिका घेत आहेत. सामाजिक, राजकीय चळवळीतील नेते, कार्यकर्ते, बुध्दीवादी पत्रकार या सर्वांना… गप्प बसा, हा विषय वेगळा आहे, दुर्लक्ष करा…! अशा सूचना देत आहेत. हा प्रकार शिवप्रेमी म्हणून माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी असून, हे सगळे नेते (वरील) सुद्धा खरे महाराष्ट्रद्रोही आहेत. कारण याच सगळ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना लोकसत्ताच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी पाहिजे आहे. त्या लाचारीतूनत हे नेते म्हणून मुकसंमती अर्थात छुपा पाठिंबा देत आहेत. सुप्रिया सुळे हे गिरीश कुबेर यांच्या पुस्तकाचं इंटरेस्टिंग बुक म्हणून कौतुक करत असतील तर गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महादजी शिंदे यांच्या बदनामीला सुद्धा सुळे यांचा पाठिंबा आहे, हे लक्षात येते. यावर कोणीही काहीही बोलत नाही म्हणून शिवप्रेमी म्हणून मलाच नाही अवघ्या अस्सल मराठी माणसांना ही सगळी मंडळी खरे महाराष्ट्रद्रोही वाटतात.
गिरीश कुबेर यांनी खोट्या इतिहासाचा संदर्भ देऊन छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या आईचा खून केला, म्हणून लिहितात, शाहू महाराज दूरदृष्टीचा अभाव असणारे व कर्तुत्व नसणारे छत्रपती होते. तर महादजी शिंदे हे विश्वासघातकी होते…’ अशा पद्धतीने वादग्रस्त लिखाण केलेले आहे. शिवप्रेमी म्हणून या लिखाणाचा प्रचंड संताप येत असून त्यांची दलाली करणारे सगळ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हे ‘षंढ’ अवस्थेत आहेत. त्यांना महाराष्ट्रातील कुबेर नावाच्या जेम्स लेन चा राग येत नाही. सध्याच्या सत्ताधारी, बेगडी, पुरोगामी राजकीय पक्षांनी बऱ्याच संघटना, संस्था आणि नेते हे विकले गेलेले असल्यामुळे त्या सुद्धा काहीही बोलायला तयार नाहीत. महाराष्ट्रात सध्या दलालांचा बाजार भरत असून दररोज विचारांचा खून होत आहे.
शरद पवार निर्मित व गांधी, ठाकरे सरकार दिग्दर्शित महाविकास आघाडी सरकार शिवद्रोही पत्रकार गिरीश कुबेर यांना पाठीशी घालत आहे, त्यामुळे हे सरकारच खरेत तर महाराष्ट्रद्रोही आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये, अशी संभाजी ब्रिगेडची त्यामुळेच भूमिका आहे.
महाराष्ट्रात ‘छत्रपतीं’पेक्षा कोणीही मोठा नाही. त्याच छत्रपतींची बदनामी गिरीश कुबेर जाणीवपूर्वक करतात. वादग्रस्त लिखाण केलेले असताना सुद्धा पवार-ठाकरे कुबेर यांना पाठीशी घालून या वादग्रस्त प्रकरणात गिरीश कुबेर यांना वाचवलं जात आहे. परंतु संभाजी ब्रिगेड वादग्रस्त लिखाण सहन करणार नाही. ॲमेझॉन (AMAZON) वरचे पुस्तक तात्काळ हटवावे. महाराष्ट्र सरकारने गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर तात्काळ बंदी घालून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.
आम्ही शिवप्रेमी म्हणून सध्या शांत आहोत. पण ही वादळापूर्वीची शांतता नक्कीच आहे. सध्या महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्यावतीने प्रत्येक तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस स्टेशन या ठिकाणी रितसर तक्रारी केलेल्या असून दखल घेतली जात नाही. गुन्हेगाराला कोण व का पाठीशी घालतंय. मात्र सरकार वेळकाढूपणा करत आहे. शिवप्रेमींच्या भावनांशी खेळून चीड निर्माण करत आहे. यामुळे भावनांचा उद्रेक होणार हे नक्की.
छत्रपतींची बदनामी केल्यामुळे गिरीश कुबेर हे दुसरे जेम्स लेन आहेत, असे म्हणणे चुकीचे नाही. या अशा चुकीच्या लोकांनीच जेम्स लेनला माहिती पुरवली होती, म्हणून चुकीचे लिखाण केलं गेलं. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने या विषयाचे भांडवल करून २००४ मध्ये सत्तेवर आले, ते मात्र आज सत्तेत असताना मूग गिळून गप्प आहेत, हे सहन होणार नाही. म्हणून पुस्तकावर तात्काळ बंदी घालून गिरीश कुबेर याला अटक करावी, अशीच मागणी आहे.
तथाकथित इतिहासकारांनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सोयीस्कर आणि चुकीच्या पद्धतीने मांडलेला आहे. तत्कालीन इतिहासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, समकालीन पुरावे नष्ट करून खोटा चुकीचा व संकुचित बदनामीकारक पद्धतीने इतिहास लिहिला गेला. ‘इतिहास घडवला मावळ्यांनी, परंतु तो कर्तृत्वाचा इतिहास लिहिला नाही आणि ज्या मनुवादी कावळ्यांनी इतिहास लिहिला, तो वाईट हेतूने चुकीच्या पद्धतीने लिहिला, रंगवला गेला आहे. तो संपूर्ण इतिहास सूडबुद्धीने लिहिलेला आहे. त्यामुळे सरसकट सर्व बहुजन समाजाला खरा आणि सत्य इतिहास सांगायचा लिहायचा किंवा दाखवायचा असेल तर इतिहासाचं पुनर्लेखन झालंच पाहिजे व जनतेसमोर खरा आणि सत्य इतिहास लोकांसमोर आला पाहिजे. कोणत्याही महापुरुषांची बदनामी आम्ही सहन करणार नाही.
गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करून पुस्तकावर तात्काळ बंदी घातलीच पाहिजे. नाहीतर छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामी जशी पुस्तकात जेवढा राहील तेवढा काळ महाराष्ट्रातीस शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते, त्यांना साथ देणारे इतर वेळी आक्रमक राहणारे आणि आता थंड पडलेले सामाजिक नेते, विद्वान, बुद्धिमंत, पत्रकार आणि गप्प बसलेले भाजपाचे ते नेतेही महाराष्ट्र द्रोही म्हणूनच कायम लोकांच्या मनात नोंदवले जातील. पुस्तकातील बदनामी आम्ही न्यायालयीन मार्गानेही बदलून घेऊ, पण या महाराष्ट्रद्रोही नेत्यांना इतिहासही क्षमा करणार नाही!
(संतोष शिंदे हे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रचे प्रदेश संघटक आहेत.)
संपर्क 9850842703 @esantoshshinde