मुक्तपीठ टीम
या कोरोनाच्या काळात अनेक नेते, आमदार, खासदार सामान्यांच्या मदतीसाठी धावले. कोणी कोरोना सेंटर उभारले तर कोणी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मदत केली. हिंगोलीतील आमदार तर सर्वात वेगळे निघाले. त्यांनी सामान्यांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळावे यासाठी स्वत:ची ९० लाखांची एफडी मोडली आहे. हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी स्वतःची मुदत ठेव मोडून ९० लाख एका खासगी वितरकाला कंपनीला आगाऊ रक्कम म्हणून भरण्यासाठी दिले आहेत.
मागील दहा ते बारा दिवसांपासून हिंगोलीत कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यात औषधांचा तुडवडा निर्माण झाला आहे. मात्र, आपल्या मतदार संघातील नागरिकांची काळजी आणि त्यांचा जीव वाचवणे हे कर्तव्य मानत आमदार संतोष बांगर दिवस रात्र धावपळ करत आहेत. त्यांना स्थानिक केमिस्टनी रेमडेसिविर मिळत नसल्याने रुग्णांचे जीव धोक्यात आल्याचे सांगितले. आधी त्यांनी आपल्याला जमेल तसे उपलब्ध करुन दिले. पण पुढे तेही मिळेना तेव्हा त्यांनी मोठ्या केमिस्ट वितरकांना जास्त संख्येने मागवण्यास सांगितले. त्यांनी सरकारकडेही पाठपुरावा केला. मात्र त्या वितरकांना देण्यासाठी सरकारी प्रक्रियेत आगाऊ रकमेची सो नव्हती. अखेरीस आमदार संतोष बांगर बँकेत गेले. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी मुदत ठेवीत ठेवलेले ९० लाख मोडले. ती रक्कम औषध वितरकांना दिली. त्यांना सरकारने पैसे दिले की ते मला देतील. पण आज माझ्या लोकांचा जीव वाचणे महत्वाचे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
असाच आमदार पाहिजे…
• सुरुवातीला ९०० रुपये दराने जवळपास ५०० इंजेक्शन आणि आमदार संतोष बांगर यांनी मोफत वाटले होते.
• मात्र नंतर या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आणि दर वाढले.
• त्यानंतर एक हजार आठशे रुपयांनी काही इंजेक्शन वाटले. नंतर त्यांच्याकडे इंजेक्शन मिळतात, म्हणून त्यांना अनेकांचे फोन येऊ लागले.
• मात्र बाजारपेठेत व इतर जिल्ह्यांतही इंजेक्शन मिळत नसल्याने अडचणी वाढल्या.
• हिंगोली जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा स्टॉक संपला असून जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे तर एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्रशासनाकडून ती वेळेत न मिळाल्यास व्याजाचा भुर्दंड कोणी सोसायचा म्हणून अशातच एकही वितरक इंजेक्शन्स मागवत नव्हता.
• ही बाब आमदार संतोष बांगर यांच्या कानावर पडली त्यांनीही प्रशासकीय चाकोरीला मुरड घालून ऑर्डर देण्याचे प्रयत्न केले. मात्र यातून काहीच मार्ग निघत नव्हता.
• यात आगाऊ रक्कम देण्यास विलंब होत असल्याचे लक्षात घेता एका खासगी वितरकास स्वत:च्या फिक्स डिपॉझिटमधील ९० लाखांची रक्कम उपलब्ध करुन दिली आहे.
• यातून उपलब्ध होणाऱ्या इंजेक्शनच्या पुरवठ्यानंतर संबंधित वितरकास जिल्हा प्रशासन जेव्हा निधी देईल, तेव्हा तो आमदार बांगर यांनी मिळणार आहे.
• त्यातही ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्यांनी ही तूर्त उपलब्ध करुन दिली आहे.
• आता दोन दिवसांत ही इंजेक्शन्स उपलब्ध होतील, अशी आशा आहे.
पाहा व्हिडीओ: